होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

न्यायालयाचा दणका: नाशिकच्या लाचखोर पोलीस हवालदाराला चार वर्षांची शिक्षा

On: September 13, 2026 2:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराला लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा आणि एकूण १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रामचंद्र राजराम आडके, पोलीस हवालदार, वर्ग-३, नाशिक तालुका पोलीस ठाणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आडके यांनी एका गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या चुलत भावाला अटक करून पोलीस कोठडी न घेता थेट न्यायालयात हजर करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. या प्रकरणात सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले होते. त्यानुसार २४ सप्टेंबर २०१४ रोजी गिरणारे आउट पोस्ट येथे पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आडके यांना रंगेहाथ पकडले होते. पदाचा गैरवापर करून बेकायदेशीररीत्या आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी पूर्ण करून नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीनंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एल. मोरे, कोर्ट क्रमांक ४, नाशिक यांनी आडके यांना दोषी ठरविले. न्यायालयाने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कलम ७ अंतर्गत तीन वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड, तर कलम १३(२) अंतर्गत चार वर्षांचा कारावास व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अनुक्रमे तीन व चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सचिन गौरवाडकर यांनी काम पाहिले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विकास लोडे, तसेच कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे, प्रभाकर गवळी आणि किरण धुळे यांनी कामकाज केले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment