होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

OPPO F35 Series Launch: ओप्पो एफ35 सिरीज भारतात लाँच: फोनची बाजारातील किंमत अन् वैशिष्ट्य जाणून घेऊया

On: October 5, 2026 5:33 PM
Follow Us:
---Advertisement---

OPPO F35 Series Launch: ओप्पो एफ-F35 सिरीज भारतात लाँच: फोनची बाजारातील किंमत अन् वैशिष्ट्य जाणून घेऊया

oppo f35 series launched in India see market price of the phones

oppo mobile, oppo mobile phone, oppo f35, f35 series, mobile phone market, mobile gadgets, oppo news series, ओप्पो मोबाईल, ओप्पो मोबाईल फोन, ओप्पो एफ35, एफ35 सिरीज, मोबाईल फोन मार्केट, मोबाईल गॅझेट्स, ओप्पो न्यूज सिरीज,

OPPO F35 SERIES LAUNCH: ओप्पोने भारतात धमाकेदार सिरीज लाँच केली आहे. (OPPO F35 Series) त्यामध्ये 8 हजार एमएएचची बॅटरी, 80W चार्जिंग, 50MP सेल्फी कॅमेरा आणि IP69K संरक्षण देण्यात आले आहे. मिड रेंजचा हा फोन फ्लॅगशिप फोनला टक्कर देईल. OPPO ने भारतात आपली नवीन F35 सिरीज लाँच केली आहे, ज्यामध्ये OPPO F35 5G आणि OPPO F35 Pro 5G यांचा समावेश आहे. हे नवीन स्मार्टफोन्स भारतात एफ सिरीजच्या 10 वर्षांच्या पूर्ततेचे प्रतीक आहे. आणि कॅमेरा, बॅटरी लाईफ व टिकाऊपणा यावर ओप्पोने लक्ष केंद्रित केले असून त्याची वैशिष्ट्ये यात देण्यात आली आहेत. दोन्ही मॉडेल्समध्ये 100-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल फ्रंट कॅमेरा आणि ओप्पोतर्फे ‘NaturalTone 2.0’ तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

ओप्पोने एफ35 सिरीजची भारतातील किंमत

दरम्यान OPPO F35 5G चा हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज प्रकारात आहे. त्याची किंमत 38,999 रुपये आहे, तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 42,999 रुपये इतकी दिली आहे. तसेच OPPO F35 Pro 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 45,999 रुपये आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 49,999 रुपये आहे, तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 54,999 रुपये आहे.

ओप्पो सिरीजची वैशिष्ट्ये

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 100-डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू असलेला 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO चे ‘NaturalTone 2.0’ तंत्रज्ञान त्वचेचा रंग अधिक नैसर्गिक वाटावा अशा प्रकारे फोटो काढण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. या फोन्समध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, तसेच OPPO F35 Pro 5G मध्ये फ्रंट आणि रिअर अशा दोन्ही कॅमेऱ्यांमधून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

कुठे उपलब्ध आहे

हे स्मार्टफोन्स 11 ऑक्टोबरपासून भारतात ऑफलाइन रिटेल स्टोअर्स, ओप्पो इंडिया ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ओप्पो F35 5G हा ‘वेव्ह ब्लू’ (Wave Blue), ‘टायटॅनियम ग्रे’ (Titanium Grey) आणि ‘मिस्ट पिंक’ (Mist Pink) रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर, ओप्पो F35 Pro 5G हा ‘सनराईज ऑरेंज’ (Sunrise Orange), ‘ट्विलाइट ब्राउन’ (Twilight Brown) आणि ‘वेव्ह ब्लू’ (Wave Blue) रंगांमध्ये येतो.

बापरे! 8,000MAH बॅटरी

एफ35 सिरीजमध्ये 8,000 ‘एमएएच’ची बॅटरी असून ती (80W) आठ व्हॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे स्मार्टफोन्स धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह येतात. हे दोन्ही मॉडेल्स Android 17 वर आधारित नवीनतम ColorOS 17 वर चालतात आणि विविध रॅम (RAM) व स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत. ओपो F35 प्रो- 5G मध्ये 256 जीबीपर्यंतचे इंटरनल स्टोरेज मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment