होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अमेरिका नव्याने हल्ला करण्याच्या तयारीत; इराणी लष्कराचा इशारा! ट्रम्प- पेझेश्कियान भेट? संयुक्त राष्ट्राच्या बैठकीकडे लक्ष

On: September 21, 2026 12:33 PM
Follow Us:
---Advertisement---

Iran US War: अमेरिका पुन्हा एकदा इराणवर हल्ले करण्याच्या तयारीत आहे. इराणच्या सशस्त्र दलांवर देखरेख करणाऱ्या ‘खातम अल-अंबिया’ केंद्रीय मुख्यालयाने रविवारी हा इशारा दिला. यामुळे, गेल्या काही महिन्यांत थेट हल्ल्यांचे प्रमाण कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा संघर्षाची नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान (Strait of Hormuz) होर्मूझ सामुद्रधुनीवरून दोन्ही पक्षांतर्फे दावे प्रतिदावे केले जात आहे.

तेहरानने स्पष्ट केले की, अमेरिकेने पुन्हा हल्ला केल्यास मध्यपूर्वेतील अमेरिकन तळ आणि हितसंबंध असलेल्यांना प्रत्युत्तर दिले जाईल; तसेच त्यांनी या क्षेत्रातील देशांना वॉशिंग्टनला मदत न करण्याचा इशाराही दिला. लष्करी मुख्यालयाने म्हटले आहे की, ज्या देशांनी आपल्या भूभागाचा किंवा सुविधांचा वापर अमेरिकेच्या हल्ल्यांसाठी होऊ दिला, त्यांना “सहभागी” मानले जाईल आणि त्यांना इराणच्या प्रत्युत्तराचा सामना करावा लागू शकतो.

ट्रम्प- पेझेश्कियान भेट?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रविवारी ‘फॉक्स न्यूज’ला सांगितले की, ते इराणबाबत “निर्णय घेण्याच्या मनस्थितीत” आहेत आणि त्यांच्या पर्यायांमध्ये पुढील लष्करी कारवाई, आर्थिक दबाव किंवा एखादा करार यांचा समावेश आहे. ते असेही म्हणाले की, या आठवड्यात न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभे दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांची भेट घेण्यास ते तयार आहेत.

न्यूयॉर्कमधील यूएनच्या आमसभेसाठी अरागची जाणार

सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची (Abbas Araghchi) रविवारी संध्याकाळी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी तेहरानहून रवाना झाले; वाटेत ते कतारमध्ये थोडा वेळ थांबणार आहेत. संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घलिबाफ यांनी रविवारी खासदारांना सांगितले की, कोणत्याही लाभासाठी मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्यापूर्वी तेहरानने आपल्या विरोधकांना मागे हटवण्यासाठी लष्करी बळाचा वापर केला पाहिजे. असे वृत्त अल जंजिराने दिले.

इराणच्या ‘या’ अटी

तेहरानने कतार आणि पाकिस्तानच्या मध्यस्थांना सांगितले आहे की, पुन्हा चर्चा सुरू करण्यासाठी युद्ध आणि अमेरिकेचे हल्ले थांबवणे, गोठवलेली इराणची मालमत्ता मुक्त करणे आणि इराणच्या बंदरांवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवणे या अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. घलिबाफ म्हणाले की, जोपर्यंत वॉशिंग्टन आधीच्या करारानुसार आपली वचने पूर्ण करत नाही, तोपर्यंत ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (होर्मुझची सामुद्रधुनी) बंद राहील.

तेहरानमधून बातमी देणारे ‘अल जझीरा’चे प्रतिनिधी तोहिद असादी यांनी सांगितले की, इराणचे अधिकारी जाणीवपूर्वक दुहेरी संदेश देत आहेत; त्यातून ते एकाच वेळी मुत्सद्देगिरीसाठी तयार असल्याचे आणि त्याचबरोबर पुन्हा संघर्षाची तयारी करत असल्याचे संकेत देत आहेत.

दोन्ही बाजूंमध्ये मध्यस्थी करणारे आखाती राष्ट्र कतारने म्हटले आहे की, त्यांचे अधिकारी विविध राजधान्यांचा दौरा करत आहेत आणि वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने प्रस्तावांची देवाणघेवाण करत आहेत.कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी (Majed Al-Ansari) यांनी सांगितले की, वॉशिंग्टनला करार हवा आहे, अशी ग्वाही अमेरिकन अधिकाऱ्यांकडून कतारला मिळाली आहे.

‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’च्या वाहतुकीवर परिणाम

या संघर्षामुळे ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील हालचालींवर आधीच परिणाम होत आहे. हा अरुंद जलमार्ग आखाती प्रदेशाला अरबी समुद्राशी जोडतो आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. जहाज वाहतुकीच्या आकडेवारीनुसार, आठवड्याच्या शेवटी १२ मालवाहू जहाजांनी सामुद्रधुनी ओलांडली, जी संख्या मागील आठवड्याच्या शेवटीच्या ३५ जहाजांपेक्षा कमी होती. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर फेब्रुवारीच्या अखेरीस या युद्धाला सुरुवात झाली.

६० दिवसांच्या कराराची मुदत संपून महिना उलटला

जूनमध्ये झालेल्या ६० दिवसांच्या सामंजस्य करारामुळे मोठ्या प्रमाणावरील लढाई कमी झाली होती, परंतु गेल्या महिन्यात तो करार संपुष्टात आला आणि तेव्हापासून होर्मुझच्या आसपास हल्ले वाढले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे रणनीतिकार आणि व्हाईट हाऊसचे माजी राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी मार्क फायफल (Mark Fayfal)यांनी अल जझीराला सांगितले की, दोन्ही देश “या गोठलेल्या संघर्षात अडकले आहेत” आणि संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीच्या निमित्ताने होणाऱ्या संभाव्य राजनैतिक चर्चेपूर्वी दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

केंद्रीय कर्मचारी अन् निवृत्तीधारकांच्या ‘डीए- डीआर’मध्ये लवकरच होणार वाढ; ‘एआयडीइएफ’ने सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Leave a Comment