होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे उभारणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

On: September 23, 2026 6:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: मुंबईसह आजूबाजूच्या उपनगरांमधील रहिवाश्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईसह महानगर प्रदेशातील घरांची वाढती गरज लक्षात घेऊन पुढील १५ ते २० वर्षांत ३० लाख घरे उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी केली. त्यामध्ये मुंबईसह ठाणे, मीरा-भाईंदर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या शहरांमध्ये क्लस्टर पुनर्विकासाला चालना देण्याचे शासनाचे धोरण राहणार आहे. युनिफाइड डीसीपीआरमधील बदलांमुळे क्लस्टर आणि एसआरए प्रकल्पांना गती देण्याचे संकेत शिंदे यांनी दिले.

३० लाख घरांचे उद्दिष्ट

ठाणे महापालिकेच्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टर योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. एमएमआरमध्ये ३० लाख घरांचे नियोजन यापूर्वीही शिंदे यांनी जाहीर केले असून, त्यात मुंबईत १० लाख आणि एमएमआरच्या अन्य भागांत २० लाख घरांचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.. सुमारे २० हेक्टर अर्थात ५० एकर परिसरात विकसित होणाऱ्या सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरमुळे ठाण्यातील सुमारे सहा हजार कुटुंबांना सुरक्षित आणि दर्जेदार घरे मिळणार आहेत. निवासी इमारती उभारण्याबरोबरच २३ प्रकारच्या नागरी सुविधा, रोजगाराच्या संधी आणि नियोजित टाऊनशिप उभारून ‘नवे ठाणे’ साकारण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले. ठाणे क्लस्टर योजनेत मोडकळीस आलेल्या इमारती, चाळी आणि झोपडपट्ट्यांचा एकत्रित पुनर्विकास करण्याची संकल्पना आहे.

अशी असेल संकल्पना

या प्रकल्पात रुंद रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, उद्याने, मैदाने, कम्युनिटी हॉल, जिम्नॅशियम, योग केंद्र, इनडोअर गेम्स, डिजिटल लायब्ररी, डे-केअर सेंटर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र आणि स्मार्ट स्ट्रीट लाइटिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘सिटी विथिन द सिटी’ या संकल्पनेतून हा विकास केला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

१२ आराखड्यांना मंजुरी

किसननगरमधील साईराज इमारत दुर्घटनेसह विविध दुर्घटनांनंतर धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर उपोषणे, मोर्चे आणि विधानसभेत आवाज उठविला. नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून धोरणात्मक अडथळे दूर करून क्लस्टर योजना प्रत्यक्षात आणल्याचे शिंदे म्हणाले. किसननगरमधील पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे असून, लवकरच रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने क्लस्टर विकासासाठी ‘क्लस्टर विकास कंपनी’ स्थापन केली असून, ५० नागरी पुनरुत्थान आराखड्यांपैकी १२ आराखड्यांना मंजुरी मिळाली आहे.

घरांच्या दर्जात तडजोड नाही

रहिवाशांच्या मागण्यांबाबत कॉर्पस फंड, अतिरिक्त १०० चौरस फुटांची जागा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि छोट्या दुकानदारांच्या पुनर्वसनाचा विचार करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले. विकासकांनी नफा कमी झाला तरी चालेल, मात्र घरांच्या दर्जात तडजोड करू नये, अशी सूचना त्यांनी केली.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment