होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सत्तेचा पैसा श्रीमंतांच्या घशात नव्हे, शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे: आ. बच्चू कडू यांचे प्रतिपादन; आ. किशोर पाटील यांच्या मंत्रिपदाचे संकेत!

On: September 24, 2026 5:45 PM
Follow Us:
---Advertisement---

Pachora News: सध्याच्या दुष्काळाच्या परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे संवाद दौरे करणार आहे. शेतकऱ्यांसाठी शिवसेनेची कणखर भूमिका आहे. शेतकऱ्यांची संकटे कमी होत नाहीत. शेतकरी सबसिडी शिवाय जगू शकत नाही. सत्तेचा पैसा श्रीमंतांच्या घशात नव्हे तर शेतकऱ्यांच्या खिशात गेला पाहिजे, शिवसेना हा सामान्य माणसाचा आवाज आहे. आम्ही सत्तेत असताना तत्व सोडणारे नाही. अशी ग्वाही आ. बच्चू कडू यांनी दिली.

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा- भडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने पाचोरा येथे गुरूवार रोजी सकाळी अकरा वाजता सारोळा रोड वरील समर्थ लॉन्स येथे शेतकरी नेते, माजी मंत्री आ. बच्चू कडू यांचा शिवसंवाद दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शेतकरी नेते बच्चू भाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, अडचणी, पावसाळी परिस्थिती, शेतीमालाला बाजार पेठेत न मिळणारा भाव, विजेच्या ,पाण्याच्या अडचणी, मागण्याबाबत आम्ही शिवसेना नेते एकनाथराव शिंदे यांचे लक्ष वेधले. त्यांच्या नेतृत्वात राज्य सरकारला कर्ज माफी करायला भाग पाडले. शेतमजूर, दिव्यांग यांच्या मानधनात वाढ केली.

आ. किशोर पाटील यांच्या मंत्री पदाचे संकेत

आ .बच्चूभाऊ कडू यांनी आमदार किशोर पाटील यांचे शिवसेना वाढीसाठी केलेल्या कार्याचा आणि विकास कामाच्या कार्य पद्धतीचे जाहीर कौतुक केले. आगामी काळात बदलत्या राजकारणात आ. किशोर पाटील यांचे मंत्री पदाचे संकेत दिले. तसेच येणाऱ्या पाच वर्षात पक्षनेते श्री. शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात शिवसेनेची एकहाती सत्ता येणार असून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असे राजकीय भाकित वर्तविले.

याप्रसंगी आ. किशोर पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उप सभापती पि.ए. पाटील, उप नगराध्यक्ष किशोर बारवकर ,भडगाव न .पा. गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक विजय भोसले, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील,शेतकरी सेना जिल्हा प्रमुख सुनील पाटील अरुण पाटील, माजी नगराध्यक्ष, जारगाव माजी सरपंच सुनील पाटील, स्विय्य सहाय्यक राजेश पाटील, शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी,महिला पदाधिकारी, नगरसेवक, दोन्ही तालुक्यातील माजी सरपंच, सदस्य, बाजार समिती संचालक, पदाधिकारी , कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्तेशिवाय विकास शक्य नाही

आ. किशोर पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले की ,सत्ते शिवाय विकास शक्य होत नसल्याने सत्तेचा योग्य वापर करून मतदार संघाचा विकास करीत आहे. केलेल्या प्रचंड कामांमुळेच आज नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीसह सर्व ठिकाणी सत्ता शिवसेनेच्या ताब्यात आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि सोबत ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार असून या निवडणुका नक्की केव्हा होणार! होणार की नाही,या बाबत चित्र स्पष्ट होत नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

यंदा हाती चाळीस टक्केच शेती उत्पन्न

सद्य परिस्थितीत राज्यात दुष्काळाचे सावट असून सुपर अलनिनो संकट येण्याची शक्यता असल्याने साठा केलेल्या पाण्याचा शेतीसाठी आणि पिण्यासाठी योग्य नियोजन करावे लागणार आहे. यंदा कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाती चाळीस टक्के शेती उत्पन्न येण्याची शक्यता असल्याने चिंता वाढली आहे. मतदार संघात विजेचे प्रश्न गंभीर असून पावसाळ्यात लोड शेडिंग करण्याचे कारण काय? वीज वितरण विभागाच्या वतीने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांकडे वीज वितरण विभाग बळजबरीने स्मार्ट मीटर लावत असल्याने सामान्य लोकांना न परवडणारे हजारो रुपयांचे बिल येत असून मी वीज विभागाचा हा गोरख धंदा चालू देणार नाही.असा इशारा देऊन वीज विभागावर आमदारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

सत्तेत असलो तरी सत्य बोलणार याचा अर्थ आपण सरकार विरोधी होत नाही. शेतकऱ्यांनी पैसे भरून देखील वीज वितरण विभाग त्यांना वेळेत सोलर कृषी पंप का देत नाही. मागील वर्षात अतिवृष्टीत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यांना नुकतीच ४५;४९ कोटींची नुकसान भरपाई मंजूर करून घेतली. राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितांचे निर्णय सरकार घेत आहे.

स्थानिक संस्था निवडणुकीत भगवा फडकणार

राज्यात सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थित निर्माण झाल्याने मतदार संघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. माझ्यावर अन्य जिल्ह्यांच्या संपर्क प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहे. पण ह्या जबाबदाऱ्या घेताना माझ्या मतदार संघाकडे दुर्लक्ष होणार असेल तर या जबाबदाऱ्या मला मान्य नाही. येणाऱ्या काळात ८० टक्के ग्रामपंचायत आणि १०० टक्के जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार नगरसेवक भीम सेनेचे जिल्हाप्रमुख प्रवीण ब्राम्हणे यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment