होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक

On: September 28, 2026 12:26 PM
Follow Us:
---Advertisement---

Bank strike News : बँकेशी संबंधीत महत्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातील बँकांचे कर्मचारी आज 28 सप्टेंबरपासून तीन दिवसांच्या संपावर जाणार होते. मात्र, हा संप स्थगित करण्यात आला आहे. संपाच्या केवळ एक दिवस आधी, आयबीए (IBA) आणि बँक कामगार संघटनांची संघटना, यूएफबीयू (UFBU), यांनी रात्री उशिरा एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होत काही निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, बँक कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला आहे.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने पाच दिवसांचा आठवडा आणि विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज म्हणजे 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2026 या तीन दिवसांसाठी बँक कर्मचाऱ्यांतर्फे देशव्यापी बँक संपाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, 27 सप्टेंबर रोजी रात्री उशीरा बँक कर्मचारी संघटनांची बैठक झाली. या बैठकीत उद्यापासून होणारा तीन दिवसांचा संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही प्रमुख मागणी संपावर जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची आहे. यूनियनच्या नेत्यांच्या माहितीनुसार मुख्य श्रम आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत सरकारकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यावर ठोस आश्वासन दिलं नाही. एआयबीओसीचे महासचिव रुपम रॉय यांनी सरकार आणि व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळं यूनियनला आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास भाग पडलं, असं म्हटलं. काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत लागू आहे. एनसीबीईचे महासचिव एल चंद्रशेखर यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, नाबार्ड या सारख्या इतर संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु आहे. शेअर बाजार, चलन बाजार आणि विदेशी चलन बाजारात देखील आठवड्यात पाच दिवस काम चालतं, असं म्हटलं. यासह पेन्शनच्या लाभातील सुधारणा, एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्याव्यात, सर्व पेन्शनधारकांना एक समान महागाई भत्ता धोरण, या देखील बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. वित्त मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारु नये असं म्हटलं आहे. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

केंद्रीय कर्मचारी अन् निवृत्तीधारकांच्या ‘डीए- डीआर’मध्ये लवकरच होणार वाढ; ‘एआयडीइएफ’ने सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Leave a Comment