होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

ऑक्टोबर हिटचा परिणाम: एक महिन्यातच वाघूर अन् हतनूरच्या जलसाठ्यात मोठी घट; जळगाव-भुसावळकर पाणी जपून वापरा!

On: October 6, 2026 2:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: एल निनोचा प्रभाव मान्सूनवर दिसून ये असून पाणी टंचाईचिनी टांगती तलवार कायम आहे. सरकारने देखील पाणी कपातीचे संकेत दिले आहे. आता हिवाळ्यात ही त्याचा प्रभाव कायम राहील, असे तज्ज्ञांनी या आधीच स्पष्ट केले आहे. त्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा पहिल्या हप्त्यातच जाणवत आहे. वाढत्या उष्णतेने जळगावमध्ये ही दुष्काळाची स्थिती आहे, पाणी व चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर राहील. जळगावला पाणी पूरवठा करणाऱ्या वाघूर धरणात आज ६३.३५ तर हतनूर धरणात २०. ८६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

एका महिन्यात वाघूरच्या जलसाठ्यात ८.९ टक्के घट झाली, तर, हातनूरच्या जलसाठ्यात ४५.२६ टक्क्याची मोठी घट जलसंपदाच्या आकडेवारीत दिसून येत आहे. ऑक्टोबर हिटमुळे पाण्याचे मोठया प्रमाणात बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसाठ्यातील ही घट चिंता वाढवणारी आहे. आगामी काळात जळगाव व भुसावळकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.

एक महिन्यात जलसाठ्यात मोठी घट

महिन्याभरापूर्वी म्हणजेच १ सप्टेंबरपर्यंत वाघूरमध्ये आजचा उपयुक्त जलसाठा १८६ (द.ल.घ.मी.) इतका होता. तर एकूण साठा २६३.५७ (द.ल.घ.मी.) होता. हतनूर धरणात आजचा एकूण उपयुक्तसाठा हा ३०१.६० (द.ल.घ.मी) तर आजचा उपयुक्तसाठा १६८ (द.ल.घ.मी) होता. वाघूर आणि हतनूरच्या जलसाठ्यात अनुक्रमे १४.७४ टक्के आणि १५.१५ टक्के वाढ झाली होती. मात्र ही वाढ झपाट्याने कमी होत जलसाठ्यात घट झाल्याचे दिसून येत असल्याने आगामी काळात पाण्याची काटकसर करावी लागणार आहे.

पाण्याची काटकसर कारवाई लागणार

सध्या आजच्या तारखेला वाघूर धरणात ६३. ३५ टक्के जलसाठा आहे. आजचा उपयुक्त जलसाठा १५७ दलघमी आहे. १ सप्टेंबर रोजी १८६ दलघमी इतका होता. तर ७५.२५ टक्के जलसाठा होता. त्यामध्ये ८.९ टक्क्याची घट झाल्याचे दिसून येत आहे. तर, हतनूरमध्ये आज ५३.२० दलघमी इतका साठा आहे. तर १ सप्टेंबरला धरणात १६८.६० दलघमी इतका होता. म्हणजेच जलसाठ्यात हातनूरच्या जलसाठ्यात ४५.२५ टक्क्याचे मोठी चिंताजनक घट दिसत आहे. खास करून भुसावळकरांना पुढील काळात पाणी कपातीचे मोठे संकट राहणार आहे. त्यामुळे पाणी फार जपून वापरावे लागणार आहे.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment