होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पावसाचा केळी बागांना बसला फटका; चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान

On: September 15, 2026 2:38 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जिल्ह्यात महिनाभर दडी मारलेल्या पावसाने आता सर्वदूर जोरदार आगमन झाले. दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे काही प्रमाणात पिकांना जीवदान मिळाले असले, तरी काढणीच्या अवस्थेतील केळी बागांसाठी हा पाऊस फटका देणारा ठरला आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने केळीच्या बागांवरही त्याचा परिणाम झाला होता. पाण्याअभावी केळीच्या झाडांच्या मुळांचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने मुळांची पकड कमकुवत राहिली. त्यामुळे झाडे वरून हिरवीगार आणि उत्पादनक्षम दिसत असली तरी त्यांना जमिनीत पुरेसा आधार मिळत नव्हता.

चोपडा तालुक्यात सर्वाधिक नुकसान

चोपडा तालुक्यातील विविध गावांमध्ये केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. काढणीच्या टप्प्यावरील केळीचे पीक जमिनीवर पडल्याने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण खर्चावर पाणी फेरले परिस्थिती निर्माण झाली आहे.

आधीच केळीला बोर्डाच्या भावानुसार अपेक्षित दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा ताळमेळ बसत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. कमी दरामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असतानाच आता पावसामुळे काढणीवरील झाडे पडल्याने दुहेरी संकट निर्माण झाले आहे.

वर्षभर मेहनत आणि मोठा खर्च करून तयार केलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नसताना आता नैसर्गिक संकटामुळे उत्पादनाचेही नुकसान होत असल्याने केळी उत्पादकांमध्ये संतापाची भावना आहे. जमिनीवर खाली पडलेले केळीचे परिपक्व तसेच अपरिपक्व घड काही काळानंतर खराब होण्याची शक्यता असल्याने त्यांची विक्री करणेही शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे.

पंचनामे करून मदतीची मागणी

काढणीच्या अवस्थेतील केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने विशेष मदत जाहीर करावी, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काढणीच्या अवस्थेतील केळीचे झाड पडणे आणि घडांचे नुकसान होणे याची स्वतंत्र नोंद घेऊन पंचनामे करण्याची मागणीही होत आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment