होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

भडगाव तहसील कार्यालय की वाहनतळ? बेसिस्त वाहनांमुळे कार्यालयात जातांना होतो अडथळा

On: September 20, 2026 3:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhadgaon News: भडगाव शहरासह तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असल्याचे चित्र दिसत असतानाच, दुसरीकडे भडगाव तहसील कार्यालयाचा परिसर मात्र बेसिस्त पार्किंगमुळे वाहनतळ बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कार्यालयाच्या आवारात आणि प्रवेशमार्गावर अस्ताव्यस्तपणे उभी करण्यात येणारी वाहने नागरिकांसाठी अडथळ्याची ठरत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.

भडगाव तहसील कार्यालयाशी तालुक्यातील सुमारे ६५ गावांचा प्रशासकीय संबंध आहे. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी दररोज शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची तहसील कार्यालयात मोठी वर्दळ असते. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच विविध शासकीय योजनांसाठी येणाऱ्या नागरिकांना कार्यालयातील विविध विभागांमध्ये जाण्यासाठी अनेकदा अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

‘तहसीलमध्ये बेशिस्त वाहनांचा अड्डा

तहसील कार्यालयाच्या परिसरात नियोजनबद्ध पार्किंगची व्यवस्था नसल्याने उपलब्ध जागेत वाहने उभी केली जात असल्याचे दिसते. परिणामी प्रवेशमार्ग, कार्यालयाकडे जाणाऱ्या वाटा आणि मोकळ्या जागांवर वाहनांची गर्दी होत असल्याने नागरिकांना मार्ग काढत कार्यालय गाठावे लागत आहे.

एखाद्या शासकीय कार्यालयात नागरिकांच्या सोयीसाठी प्रवेशमार्ग मोकळे आणि सुरक्षित असणे अपेक्षित असताना, येथेच वाहनांची गर्दी झाल्यास प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. विशेषतः वयोवृद्ध किंवा चालण्यास अडचण असलेल्या नागरिकांना या परिस्थितीचा अधिक त्रास होऊ शकतो.

वाळूवरील कारवाई होते, मग पार्किंगवर कधी?

शहर व तालुक्यात अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि संबंधित प्रकारांवर महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचे दिसत आहे. प्रशासन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करीत असेल, तर तहसील कार्यालयाच्या परिसरातील बेसिस्त पार्किंगकडेही प्रशासनाने त्याच गांभीर्याने पाहावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाहने उभी करण्यासाठी निश्चित जागा, प्रवेश व बाहेर पडण्याचे स्वतंत्र मार्ग, नागरिकांसाठी मोकळी पादचारी वाट आणि आवश्यक ठिकाणी पार्किंगबाबत सूचना फलक लावल्यास परिस्थितीत सुधारणा होऊ शकते.

कार्यालय मोकळे होणार तरी कधी?

तहसील कार्यालय हे सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे प्रशासकीय केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि अडथळेमुक्त प्रवेश मिळणे आवश्यक आहे. बेसिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांना सूचना देणे, गरज असल्यास वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करणे आणि पार्किंगची शिस्त लावणे, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

तहसील कार्यालय परिसरातील वाहनांची वाढती गर्दी आणि अस्ताव्यस्त पार्किंगला आळा घालून नागरिकांसाठी मार्ग मोकळा करण्यासाठी तहसील प्रशासन नेमकी कोणती कार्यवाही करणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment