होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सावधान! कोकण अन् पश्चिम महाराष्ट्रासह ‘या’१४ जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट

On: September 20, 2026 2:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: कोकणला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, रायगड, अन् सिंधुदुर्ग जिल्ह्याना मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यासोबतच घाटमाथा परिसराला धुव्वाधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणासह घाटमाथा परिसर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने दिला आहे. जळगावला मात्र कोणताच इशारा दिलेला नाही.

या १४ ठिकाणी मुसळधार

२१ ते २३ सप्टेंबर दरम्यान अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामध्ये पुढील १४ जिल्ह्याच्या ठिकाणांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्हयांना अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट कुलाबा वेधशाळेने दिला आहे. एकंदरीत आपत्ती व्यवथापन विभागाने येथील नागिरकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे परतीचा पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.

उद्या या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील काही भागात दुष्कळसदृश्य परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची पिके करपली आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी पिके सुकली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. उद्या चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, हिंगोली, बीड, परभणी, अहिल्यानगर या १२ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रात अंदाज असा

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला २१ सप्टेंबर वगळता पुढेही दोन दिवस हलका पाऊस सांगितला आहे. २१ ते २३ सप्टेंबरला जळगाव, धुळे , नंदुरबाराला हलका आणि मध्यम सरी कोसळतील असा अंदाज आहे. अहिल्यानगराला २१ सप्टेंबरला मुसळधार पाऊस बरसेल उर्वरित पुढील दोन दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment