होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

On: October 16, 2026 1:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: Latest Weather News: नैऋत्य मोसमी पावसाने १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून माघार घेतली आहे. दुसरे असे की एक कमी दाबाचा पट्टा ईशान्य उत्तर प्रदेशापासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत पूर्व प्रदेश आणि महाराष्ट्र मार्गे जात आहे. मोसमी पावसाची शक्यता नसली तरी अवकाळीची छाया महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांवर कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात हवामान कोरडे राहणार असून ऑक्टोबर हिट जाणवत आहे. वातावरण उष्ण आणि दमट असेल. जळगाव सलग दोन दिवसांपासून तापले असून गुरुवारी ३६.३ तर आज शुक्रवारी देखील पारा ३६ अंशांवर पोहचला आहे. शनिवारी तापमान ३७ अंशांवर राहील असा अंदाज असून जळगावकर उन्हाच्या कडाक्यापासून स्वतःला जपा, तसेच उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा कारण की सकाळपासूनच उकाडा व दमट वातावरण (आर्द्रता) जाणवत आहे.

कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

काही ठिकाणी मुसळधार पाऊस

१५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत काही ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. तर, १८ ते १९ ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकण व गोवा, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

उद्या सातारा-कोल्हापूर घाटासह ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट

१७ ते १९ दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. त्यापैकी उद्या १७ ऑक्टोबरला ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग,कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा,सातारा घाट,सांगली, सोलापूर, धाराशिव या ११ जिल्ह्यांना हवंन विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. शनिवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण-गोवा येथील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी तसेच, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे.

१८ ऑक्टोबरला १४ जिल्ह्यांना येलो अलर्ट

कोल्हापूर- सातारा आणि पुणे घाट परिसरासह रायगड. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, या १४ जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. या ठिकाणी हवामान खात्याछा मुसळधार पावसाचा इशारा आहे.

१९ ऑक्टोबरला १३ जिल्ह्यांना अलर्ट

कोल्हापूर घाट परिसरासह सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली, नागपूर या १३ जिल्ह्यांना मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे.

२० ऑक्टोबरला १६ जिल्ह्यांना येलो अलर्ट

पुणे-कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरासह रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड. लातूर, धाराशिव,गडचिरोली, नागपूर या १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. सद्या महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून अवकाळी पाऊस झाल्यावर कमीत कमी काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याचा बंदोबस्त होईल, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांना आहे. शेतकऱ्यांसाठी तर दुष्काळाचे मोठे आव्हान आहे चारा आणि शेती तसेच पिण्याच्या पाण्याचे संकट कायम आहे.

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment