होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

On: October 18, 2026 7:48 PM
Follow Us:
---Advertisement---

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जटवाडा भागातील पुलतांडा परिसरात एका २४ वर्षी तरुणीच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. या तरुणींनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तर, पोलिसांना पूर्णपणे अंधारात ठेवून शवविच्छेदन न करताच रात्रीच्या अंधारात शेतात मृतदेहावर अंत्यसंस्कार उरकल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली आहे. त्यातच मृत्यूपूर्वी तरुणीने एका मित्राला पाठवलेला शेवटचा रहस्यमयी मेसेज आणि त्यानंतर घडलेल्या धक्कादायक घटनेने प्रकरण आणखी गुंतागुंतीच्या वळणार पोहचले आहे.

घटना अशी

मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा राठोड (वय २४, रा. जटवाडा भाग, पुलतांडा) ही तरुणी नर्सिंगचा अभ्यास पूर्ण करून सेव्हन हिल परिसरातील एका खाजगी रुग्णालयात नोकरीला होती. शुक्रवारी मध्यरात्री ती राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला. आई, वडील आणि दोघे भाऊ यांनी तिला तात्काळ एका खाजगी दवाखान्यात नेले, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यांनतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला कुटुंबाला दिला होता; परंतु कुटुंबीयांनी तो सल्ला न मानता मृतदेह थेट घरी आणला आणि कुणाला कानोकान खबर न लागू देता शेतात नेऊन परस्पर अंत्यसंस्कार करून टाकला, असा आरोप कुटुंबावर होत आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल

दरम्यान पोलिसांना या प्रकरणाची गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला. उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक स्वाती केदार, सहायक निरीक्षक सचिन सदाफले आणि सहायक फौजदार सुभाष शेवाळे आदीचे पथक तातडीने घटनास्थळी धाव घेत दाखल झाले. त्यांनी प्रकरणाची कसून चौकशी केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत खात्री पटवली की, कुटुंबीयांनी अत्यंत घाईघाईने पोलिसांना न कळवता घटना कशामुळे घडली हे लपवण्यासाठी परस्पर अंत्यसंस्कार केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान पोलीस आयुक्तांनी घटनेची दाखल घेतली. या प्रकरणी तपास करण्यास फॉरेंसिक तज्ज्ञांचे पथक धाडले. या पथकाने मानवी हाडे आणि अस्ती जप्त केली, सायबर सेल आणि फॉरेंसिक टीमच्या संयुक्त तपासातून मृत्यूची नेमकी कारणं आणि वेळ त्या गूढ चॅटमागचे सत्य शोधाच्या दिशेने तपास सुरू केला.

मित्राला पाठवला शेवटचा संदेश

या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. तरुणीच्या मोबाईलमधील चॅटचे गूढ उकलण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दरम्यान पोलिसांनी मृत तरुणीचा मोबाईल फोन जप्त केला असून, त्याची तपासणी केल्यावर मोबाईलमधील चॅट समोर आल्यानं पोलीसांना ही धक्का बसला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी शिल्पा राठोडने एका मित्राला मेसेज पाठवला होता. त्यात तिने फॉरएव्हर बाय, आता बोलणे होणार नाही. त्यावर त्या मित्राने घाबरून असे बोलू नकोस, मूर्ख आहे का? असा प्रतिमेसेज पाठविल्याचे समोर आले. याप्रकरणी पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment