होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्यातील ‘या’ ५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा येलो अलर्ट; जळगावसह उत्तर महाराष्ट्राचे हवामान पुढील ४ दिवस ‘असे’ राहिल

On: October 11, 2026 3:20 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या ५ जिल्ह्याना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट इशारा दिला आहे. तसेच धुळे नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात १२ ते १६ ऑक्टोबर दरम्यान हवामान कोरडे आणि उष्ण राहणार आहे. त्यामुळे वातावरणात उष्मा जाणवणार आहे. विशेषतः मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढत आहे.

जळगावचे कमाल तापमान आज ३७ अंश सेल्सियस आहे. तर, वातावरणात ६७ टक्के आर्द्रता असून हवामान दमट आहे. मात्र, त्यानंतर १ ते ३ अंश सेल्सियसने तापमानात पुढील काही दिवसात घटेल, असा अंदाज आहे. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान सूर्य प्रकाशमान राहणार

कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा जिल्ह्यात मुख्यतः सूर्यप्रकाशित हवामान राहण्याची दात शक्यता आहे. दि. ११ ते १७ ऑक्टोबर दरम्यान राज्यात उत्तर कोकण, दक्षिण कोकण-गोवा,उत्तर मध्य महाराष्ट्र,मराठवाडा, गुजरात प्रदेश, सौराष्ट्र-कच्च या ठिकाणी हवंन कोरडे आणि दमट राहणार आहे असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कमाल तापमान

पुढील ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात १ ते ३ अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल आणि त्यानंतर त्यात फारसा बदल होणार नाही. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांत कमाल तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत गुजरात क्षेत्रातील कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. तसेच पुढील ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्र क्षेत्रातील किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. असा अंदाज कोलाबा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे.

जोरदार वारे:- ताशी वेगवान वारे वाहील

जोरदार वारे:- ताशी वेगवान वारे वाहील

  • कोकण: कुलाबा (मुंबई) – २७ किमी ताशी, सांताक्रूझ (मुंबई) – २२ किमी ताशी, अलिबाग (रायगड) – २० किमी प्रतितास
  • मध्य महाराष्ट्र: कराड (सातारा) – ३७ किमी ताशी, महाबळेश्वर (सातारा) – ३५ किमी ताशी, कुरवंडे (पुणे) – ३० किमी ताशी
  • मराठवाडा: अंबेजोगाई (बीड) – २६ किमी ताशी, चाकूर (बीड) – २६ किमी प्रतितास

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment