होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

RBI : आरबीआयचा मोठा निर्णय! रुपया सावरण्यासाठी थेट डॉलर विक्री करणार, नियम होणार कठोर

On: October 10, 2026 3:35 PM
Follow Us:
---Advertisement---

RBI News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे. रुपया सावरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयनं इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्तान पेट्रोलियम या कंपन्यांची दैनंदिन डॉलरची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विशेष विंडो सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या प्रसिद्धीपत्रकानुसार डॉलरची विक्री इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (HPCL)आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) ला केली जाईल. हे आदेश 12 ऑक्टोबर 2026 पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. सट्टेबाजी रोखणे, राखीव जोखीम आणि करन्सी हेजिगं यासंदर्भातील उपाययोजना देखील करण्यात आल्या आहेत.

आरबीआयनं विदेशी चलन बाजारात हस्तक्षेप आणि रेपो रेटमध्ये वाढ करुन देखील रुपया डॉलरच्या तुलनेत निचांकी पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारी रुपया 96.73 प्रति डॉलर वर होता. या पार्श्वभुमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नामनिर्देशित बँकांच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांना अमेरिकन डॉलरची विक्री करण्याची सुविधा केली आहे. कंपन्यांना त्यांच्या दररोजच्या व्यवहारांसाठी लागणाऱ्या विदेशी चलनाची गरज पूर्ण करता यावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

तेल कंपन्यांसाठी स्पेशल डॉलर विंडो

आरबीआयनं तेल कंपन्यांसाठी स्पेशल डॉलर विंडो सुरु केली आहे. स्पेशल डॉलर विंडो कधीपर्यंत लागू राहील हे आरबीआयनं स्पष्ट केलं नाही.या सुविधेद्वारे तीन तेल कंपन्यांना बँकिंग प्रणालीच्या माध्यमातून डॉलर उपलब्ध करण्याचा पर्याय मिळाला आहे. तेल कंपन्यांना कच्चा तेलाच्या आयातीसाठी आणि विदेशी खर्च भागवण्यासाठी अमेरिकन डॉलरची गरज असते. आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होत असल्यानं रुपया आणि डॉलरविनिमय दरातील तेजी आणि घसरण तेल कंपन्यांच्या आर्थिक गरजांवर परिणाम करतात.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 20 लाख डॉलरपेक्षा अधिक सांकेतिक मूल्याच्या पात्र रुपयांशी संबंधित विदेशी चलन डेरिवेटिव करारासाठी विदेशी चलन जोखीम ठेव रक्कम ठेवणं बंधनकारक केलं आहे. नोंदणीकृत डीलर्सला प्रत्येक व्यवहारासाठी रुपयाच्या मुल्याच्या 20 टक्के रक्कम कॅश रिझर्व्ह म्हणून आरबीआयकडे जमा करावी लागेल. हा नियम ज्या वायद्यांवर लागू असेल, ज्याचा वापर चालू खात्याशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी (हेजिंगसाठी) केला जातो; यामध्ये वापरकर्ता रुपयाच्या बदल्यात परकीय चलन खरेदी करतो.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताय, मग टोल प्लाझाबाबत तुमचे अनुभव ‘राजमार्गयात्रा’ ॲपवर मांडा

विजयादशमीनिमित्त स्वयंसेवकांचे संचलन; आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मांडले महत्त्वाचे मुद्दे

सागरी सुरक्षेवर भर: युद्धात ‘AI’ प्रणालींचा वापर वाढवणार- नौदल उपप्रमुखांची माहिती

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

Leave a Comment