होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

उत्तराखंड चमोली भूकंपानं हादरलं: दिल्ली-एनसीआरमध्ये रात्री जाणवले धक्के; रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.९

On: October 7, 2026 1:18 PM
Follow Us:
---Advertisement---

New Delhi: मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाचा केंद्र बिंदू झारखंड चमोली असला तरी त्याचा परिणाम दिल्ली तसेच नोएडा, गुरुग्राम, गाझियाबाद आणि आसपासच्या परिसरात जाणवल्याचे वृत्त आहे. यानंतर नागरिक एकमेकांची विचारपूस करत होते. उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता ४.९ होती. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील खदून लगा ग्वालीपासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाची नोंद मंगळवारी रात्री १०:२३:१३ वाजता झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू उत्तराखंडमधील चमोली येथे १३ किलोमीटर खोलीवर होता. त्याची तीव्रता ४.९ मोजण्यात आली. भूकंपाचे अक्षांश ३०.१०३ उत्तर आणि रेखांश ७९.५६१ पूर्व होते. असे सांगण्यात आले.

खरे तर, उत्तराखंड हे हिमालयीन प्रदेशात येते, जिथे भूकंपाचा जास्त धोका संभवतो. त्यामुळे, तिथे भूकंपाचे धक्के जाणवणे असामान्य मानले जात नाही. तथापि, जेव्हा भूकंपाचे धक्के दिल्लीसारख्या मैदानी भागात पोहोचतात, तेव्हा लोक अधिक घाबरतात. कोणत्याही मोठ्या नुकसानीची किंवा जीवितहानीची अद्याप अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

केंद्रीय कर्मचारी अन् निवृत्तीधारकांच्या ‘डीए- डीआर’मध्ये लवकरच होणार वाढ; ‘एआयडीइएफ’ने सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Leave a Comment