होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! आता मूळ ओळखपत्राशिवाय प्रवास करण पडू शकतं महागात, होईल दंड

On: September 28, 2026 5:29 PM
Follow Us:
---Advertisement---

Central Railway: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेतर्फे १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तिकीट तपासणीची एक विशेष मोहीम राबवणार आहे. यामध्ये प्रवाशांच्या तिकिटांची सत्यता आणि वैधता तपासण्यावर विशेष भर दिला जाईल. स्थानकांवर आणि रेल्वे प्रवासादरम्यान तिकिटांची तपासणी करण्यासोबतच, सवलतीच्या दरातील तिकिटे, विशिष्ट आरक्षण कोटा आणि विविध पासद्वारे आरक्षित केलेल्या तिकिटांवर या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.

या मोहिमेदरम्यान, तिकीट तपासणी कर्मचारी हे सुनिश्चित करतील की सवलत किंवा विशिष्ट आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणारे प्रवासी त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले विहित मूळ ओळखपत्र सोबत बाळगत आहेत. एकाच तिकिटावर अनेक प्रवाशांचे आरक्षण असल्यास, त्या तिकिटावरील किमान एका प्रवाशाकडे विहित (नोंदवलेले) मूळ ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आवश्यक मूळ पुरावा नसल्यास, लागू नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना वैध तिकिटाशिवाय प्रवास करणारे मानले जाईल.

विशिष्ट सवलती किंवा आरक्षण कोट्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे त्यांची पात्रता सिद्ध करणारी विहित मूळ कागदपत्रे आहेत की नाही, याचीही तपासणी केली जाईल. तसेच, ई-पास/पीटीओ वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विहित मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल आणि प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी ई-पास/पीटीओ च्या बदल्यात प्रवासासाठी आवश्यक अधिकृत तिकीट/पास मिळवला आहे याची खात्री करावी लागेल.

तिकिटांची, विशेषतः अनारक्षित तिकिटांची सत्यता पडताळण्यावरही विशेष लक्ष दिले जाईल; यासाठी आवश्यक तिथे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून ‘टीटीइ ॲप’चा वापर करून प्रमाणीकरण व पडताळणी केली जाईल.आरक्षण सुविधांचा गैरवापर रोखणे, सवलती आणि पासचा फसवणुकीने होणारा वापर थांबवणे आणि रेल्वेच्या महसुलातील गळती रोखणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सागरी सुरक्षेवर भर: युद्धात ‘AI’ प्रणालींचा वापर वाढवणार- नौदल उपप्रमुखांची माहिती

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

Leave a Comment