होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Chalisgaon Crime: लोंणजे गावात महिलेची छेड काढल्याने दोन गटात तूफान राडा; थरारक घटनेत एकाचा मृत्यू, १० जण अटकेत

On: October 5, 2026 4:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये लोंणजे (Lonaje) गावात दोन गटात तूफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. येथील लोंणजे गावात एका महिलेची छेडछाड करणाऱ्यावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर गावातील वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेप्रकरणी पोलिसांनी १० जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

घटना अशी

मिळालेल्या माहितीनुसार, आज लोंणजे गावात एका महिलेच्या छेडछाडीच्या प्रकारानंतर गावात तणाव निर्माण झाला. त्यानंतर महिलेने आपल्या संबंधितांना ही बाब सांगितल्यावर दोन गट आमनेसामने आले होते. प्रारंभी काही जणांमध्ये शा‍ब्दिक चकमक उडाली. त्यानंतर झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. काही वेळातच जमाव इतका हिंसक बनला की, थेट एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी भीषण हल्ला सुरू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने जिल्ह्यात मोठी चर्चा आहे.

एकाचा मृत्यू

दरम्यान या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याचे नाव मिलन सोनवणे असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गावात दंगल सदृश्य परिस्थिती दिसत असून दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडल्याचं पाहायला मिळत असून एकमेकांना तुफान लाठ्या-काठ्यांनी हाणामारी सुरू असल्याचे दिसून येते.

पोलीस घटनास्थळी

या घटनेची माहिती पोलिसांना कळताच चाळीसगावचे पोलीस उपअधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी कारवाईला गती दिली. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाला गावात पाठवून परिस्थिती नियंत्रणात आणली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरुवातीला १३ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी पोलिसांनी दहा आरोपींना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment