होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NCMC CARD: एनसीएमसी कार्डमधील शिल्लक संपली? काळजी करू नका, आता ‘भीम ॲप’द्वारे करता येणार रिचार्ज

On: September 17, 2026 5:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. एनसीएमसी (NCMC CARD) कार्डधारकांना आता भीम ॲपच्या माध्यमातून आपल्या कार्डचे टॉप अप करता येणार आहे. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नसून, मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.

१५ सप्टेंबर पासून ‘भीम अँप’वर सेवा

एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या एनसीएमसी कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला अधिक गतिमान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने १५ सप्टेंबर २०२६ पासून भीम ॲपद्वारे एनसीएमसी कार्ड टॉप अपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असा कराल रिचार्ज

या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या पाठीमागील क्यूआर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉप अप करता येईल. त्यामुळे प्रवाशांना एनसीएमसी कार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम तत्काळ जमा करण्याची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या डिजिटल प्रवासी सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि अधिक गतिमान प्रवास’ या उद्देशाला या सुविधेमुळे आणखी बळ मिळणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्डचा वापर अधिक सुलभ होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment