होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावातील मूलभूत सुविधांसाठी मनसेचे मनपाविरोधात धरणे आंदोलन

On: October 1, 2026 4:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: शहरातील छोट्या व्यापाऱ्यांवरील अतिक्रमण कारवाई थांबवावी, मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या अतिक्रमणांवर समान निकषाने कारवाई करावी, पार्किंगसाठी असलेल्या जागेतील बेकायदा दुकाने व व्यावसायिक वापर हटवावा, रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि जळगाव शहर स्वच्छ, सुंदर व नागरिकांना मूलभूत सुविधा देणारे शहर करावे, या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आज महानगरपालिका इमारतीसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

मनसेने यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडे छोट्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन दिले होते. आईस्क्रीम गाड्या, पाणीपुरी विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, हातगाडीवाले आणि अन्य लघुव्यावसायिकांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले.

गरीबाची हातगाडी दिसते; मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का?

छोट्या व्यापाऱ्यांची हातगाडी, भाजीची टोपली किंवा पाणीपुरीची गाडी प्रशासनाला सहज दिसते; मात्र मोठ्या व्यावसायिक प्रतिष्ठानांनी सार्वजनिक जागांवर केलेली अतिक्रमणे, रस्त्यापर्यंत वाढविलेल्या व्यावसायिक जागा आणि वर्षानुवर्षे कायम असलेले ताबे यांच्यावर समान पद्धतीने कारवाई का होत नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला. यासह शहरातील काही व्यापारी संकुलांमध्ये पार्किंगसाठी असलेल्या जागेचा व्यावसायिक वापर होत असल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला.

रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रशासनाला विचारला जाब

केवळ अतिक्रमणाचा प्रश्न नाही, तर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे ही शहरातील मोठी समस्या आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो, वाहतुकीवर परिणाम होतो आणि अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे रस्त्यांची तातडीने पाहणी करून धोकादायक खड्डे बुजवावेत, रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली. यासह शहर स्वच्छतेच्या प्रश्नाकडे देखील आंदोलकांनी लक्ष वेधले.

आयुक्तांना दिले निवेदन

धरणे आंदोलन संपल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या एक दिवसीय धरणे आंदोलनामध्ये जिल्हा जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, शाखा अध्यक्ष युसुफ खाटीक, राहुल चव्हाण, आली खाटीक, साजन पाटील, राजेश मराठे, विलास सोनार, खुशाल ठाकूर, दीपक राठोड आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment