Asian Games 2026 : एशियन गेम्स 2026 मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकविले आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एशियन गेम्स 2026 चा सुवर्णपदकासाठीचा फायनल सामना पार पडला. या सामन्यात भारताने 19 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला.
यापूर्वी भारताने 2022 एशियन गेम्समध्ये सुद्धा सुवर्णपदकाची कमाई केलेली. तर यावेळी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात फायनल सामना खेळून भारताने सुवर्णपदक राखलं. भारताकडून अभिषेक शर्मा (61) आणि तिलक वर्मा (51) यांनी अर्धशतकीय धावांची खेळी केली. तर गोलंदाजांमध्ये शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर या तिघांनी प्रत्येकी 6 विकेट काढून पाकिस्तानला बॅकफूटवर ठेवलं.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. यासह पाकिस्तानला प्रथम गोलंदाजीचे आव्हान मिळाले. भारताकडून फलंदाजीला वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्माची जोडी उतरली. मात्र यावेळी टीम इंडियाची सुरुवात मात्र खराब झाली. वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसनने स्वस्तात विकेट गमावली, मात्र अभिषेक शर्माने तुफान फलंदाजी सुरु ठेवत भारताची बाजू लावून धरली. त्यानंतर श्रेयस अय्यर, ईशान किशन यांची सुद्धा चांगली साथ त्यांना लाभली. पुढे तिलक वर्माने 51 धावांची नाबाद खेळी केली. भारतीय फलंदाजांनी 6 विकेट गमावून 211 धावांचा स्कोअर उभा केला. तर विजयासाठी पाकिस्तानला 212 धावांचं आव्हान मिळालं होतं.
तिलक-शिवमची दमदार खेळी
पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाला मोठी धावसंख्या मिळवून देण्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबे यांची फलंदाजी महत्त्वाची ठरली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने 15 चेंडूंमध्ये 27 धावा ठोकल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. दुसरीकडे, तिलक वर्माने नाबाद 51 धावांची खेळी करत भारताला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. तिलकने अवघ्या 22 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांसह 51 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 211 धावा केल्या.








