होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

कुळकर्णी प्राथमिक विद्यामंदिरात पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळा उत्साहात; ३५२ विद्यार्थिनींचा सहभाग

On: September 11, 2026 5:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै.सौ.जयमंगलाबाई प्रभाकर कुळकर्णी प्राथमिक विद्यामंदिरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनींच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला व कल्पकतेला वाव देणारी पर्यावरण पूरक गणपती बनवणे कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली झाली. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृत्याचे महत्त्व ही पटवून देण्यात आले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळा इयत्ता तिसरी व चौथीसाठी घेण्यात येऊन ३५२ विद्यार्थिनींनी कार्यशाळेत सहभाग घेतला. स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणपती बनवण्याचा अनुभव विद्यार्थिनींसाठी आनंददायी ठरला. कार्यशाळेत उपशिक्षिका वृषाली ढोले व ज्योती भालेराव यांनी गणपती बनवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेला, कलाकौशल्याला व आत्मविश्वासाला चालना मिळाली तसेच पर्यावरण दृष्टिकोन देखील निर्माण झाला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment