होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खा. शरद पवार यांनी दिलेल्या पत्राला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ‘ते’ जाणून

On: September 18, 2026 6:23 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरद पवार गट) खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत एक महत्त्वाचे पत्र दिले आहे. राज्याच्या अनेक भागांत कमी पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, याचा थेट परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर झाल्याचे पवार यांनी नमूद केले आहे. पवारांनी दिलेल्या पत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळाच्या उपाययोजना आधीच सुरू केल्या आहेत. असे त्यांनी स्पष्ट केले आहे..

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, थेट मदत, पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था केली जात आहे. NDRF मदतीची वाट न पाहता, राज्य निधीतून तातडीने साहाय्य देणार आहे. सरकारने परिस्थिती गांभीर्याने घेतली असून पवारांच्या सूचनांचे स्वागत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या पत्रात खा. शरद पवारांनी म्हटले आहे की, पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, तूर आणि उडीद यांसारखी पिके पावसाअभावी करपली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पवारांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातील या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी, असे त्यांनी आवाहन केले आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत माहिती देतांना मुख्यमंत्री स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही राज्य सरकारकडून केल्या जात आहे. त्यासाठी ५ ऑक्टोबरनंतर करण्यात येणाऱ्या पंचनाम्यांच्या आधारे केंद्र सरकारकडे एनडीआरएफ अंतर्गत मदतीची मागणी केली जाणार आहे. मात्र, त्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारच्या निधीतून मदत करणार आहोत, त्याची तयारी सुरू केली आहे, ‘एनडीआरएफ’कडून मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकार स्वतःच्या निधीतून खर्च करणारअसून नंतर तो एनडीआरएफच्या निधीतून हा खर्च भरून काढला जाणार, असे फडणवीस यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुर्दैवी घटना: गरबा खेळण्यासाठी आश्रमशाळेतून पाच विद्यार्थी पळाले अन् रस्ता अपघातात जीव गमावला

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

Leave a Comment