होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

FDA Action:सप्तशृंगी गडावर ‘एफडीए’ची धडक कारवाई, ५.६२ लाखांची मिठाई नष्ट!

On: October 13, 2026 6:59 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: सण उत्सवाचा काळ असल्याने एफडीए ने अन्न भेसळ करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई सुरूच ठेवली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ मानल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी धडक कारवाई केली आहे. यावेळी भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने अन्न प्रशासनाने १३ अन्न आस्थापनांची तपासणी केली. त्यात भेसळ आढळल्याने कारवाई केली. यावेळी असुरक्षित वातावरणात साठवून ठेवलेला ५ लाख ६२ हजार रुपयांचा १४०८ किलो मिठाईचा साठा जप्त करून पथकाने नष्ट केला. त्या मिठाईच्या साठ्यात पामतेलयुक्त व माव्यासदृश्य मिठाईचा समावेश असल्याचे एफडीएला आढळून आले.

दरम्यान नवरात्रोत्सवासाठी सप्तशृंगी गडावर येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार चांगले अन्नपदार्थ मिळावेत, त्याचा येथे येणाऱ्या भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलून ही कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी असते. सुरक्षितेच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिकमधील सप्तशृंगी गडावर मोठी तपासणी मोहीम राबवली. यावेळी अधिकाऱ्यांच्या पथकाने १३ खाद्यपदार्थांच्या आस्थापनांची तपासणी केली.

या तपासणीत त्यांना काही त्रुटी आढळल्या. त्यामध्ये असुरक्षित परिस्थितीत साठवून ठेवलेले ५.६२ लाख रुपये किमतीची १४०८ किलोची मिठाई जप्त करत साठा नष्ट केले. जप्त केलेल्या साठ्यामध्ये पाम तेलाचा वापर करून बनवलेल्या आणि खव्यासारख्या दिसणाऱ्या मिठाईचा समावेश होता.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment