होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पवित्र पोर्टल पदभरती: 214 शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना

On: September 16, 2026 4:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जिल्हा परिषद जळगावच्या शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टल पदभरती 2025 अंतर्गत पात्र ठरलेल्या शिक्षक उमेदवारांना आज समुपदेशन प्रक्रियेद्वारे पारदर्शक व नियमानुकूल पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये ही समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली.

या प्रक्रियेत मराठी माध्यमातील 163 शिक्षक तसेच उर्दू माध्यमातील 51 शिक्षक, अशा एकूण 214 शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पदस्थापना देण्यात आली. उपलब्ध रिक्त पदे, उमेदवारांची पात्रता तसेच शासनाच्या नियमानुसार संपूर्ण समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक व नियमानुकूल पद्धतीने पार पाडण्यात आली. उपलब्ध पदांची उमेदवारांना आवश्यक माहिती देऊन, त्यांच्या पसंतीक्रमानुसार पदस्थापना देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

या संपूर्ण प्रक्रियेत शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. शिक्षणाधिकारी निलेश पाटील, उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र चौधरी, विजय सरोदे तसेच संपूर्ण आस्थापना लिपिक वर्गाने या प्रक्रियेसाठी मोलाचे सहकार्य केले. शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

या शिक्षक पदभरती व पदस्थापना प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शाळांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार असून, विद्यार्थ्यांना नियमित, गुणवत्तापूर्ण व अधिक परिणामकारक शिक्षण मिळण्यास हातभार लागणार आहे. ग्रामीण भागातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू आहे. नव्याने पदस्थापित होणाऱ्या 214 शिक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्था अधिक सक्षम होऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञान, कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल.”पात्र शिक्षकांना योग्य पदस्थापना, शाळांना सक्षम मनुष्यबळ आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण” या उद्देशाने राबविण्यात आलेली ही प्रक्रिया जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला गती देणारे सकारात्मक व भविष्यवेधी पाऊल ठरले आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया अधिक भक्कम करण्याच्या दिशेने जिल्हा परिषद जळगावच्या शिक्षण विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment