होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विद्युत खांबावर दुरुस्ती करताना विजेचा धक्का, महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

On: September 28, 2026 4:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: विद्युत खांबावर वीज प्रवाह दुरुस्तीचे काम करताना विजेचा धक्का लागल्याने महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. जळगाव विमानतळ रोडवर वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना हा अपघात झाला. या घटनेत महावितरणचे ३५ वर्षीय कंत्राटी कर्मचारी महेश देविदास अपार यांचा मृत्यू झाला आहे. विजेचा धक्का लागल्यानंतर ते खांबावरून खाली कोसळले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जळगाव विमानतळ रोड परिसरात वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना महेश अपार हे विद्युत खांबावर चढले होते. याचवेळी अचानक विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने ते खांबावरून खाली पडत गंभीर जखमी झाले. सहकारी आणि नागरिकांनी तातडीने महेश अपार यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली.

दरम्यान, या घटनेनंतर वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत पुरवठा बंद करण्याची प्रक्रिया आणि प्रत्यक्षात विद्युत प्रवाह सुरू झाल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. वीजपुरवठा बंद करण्याची परवानगी घेतल्यानंतरही विद्युत प्रवाह पुन्हा सुरू कसा झाला? असा सवाल महेश यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. विद्युत प्रवाह सुरू झाल्यामुळेच महेश यांना विजेचा धक्का बसल्याचा आरोप करत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. चौकशीत कोणाचीही चूक अथवा निष्काळजीपणा आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे वीज दुरुस्तीच्या कामादरम्यान सुरक्षा नियमांचे पालन, वीजपुरवठा बंद असल्याची खात्री आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय याबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment