Nashik Update: नाशिकमधून एक आश्चर्यकारक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. मालेगाव तालुक्यातील वनपट येथे पोळ्याच्या सणानिमित्त बैलाला नैवेद्य देताना चुकून तब्बल तीन तोळे वजनी सोन्याचे मंगळसूत्र बैलाने गिळल्याची घटना घडली आहे. येथील शेतकरी शिवाजी वनाजी बोरसे यांच्याकडे दोन बैल असल्याने नेमक्या कोणत्या बैलाने ती पोत गिळली, हे लक्षात येत नसल्याने शेवटी दोन्ही बैलांचा एक्स-रे करण्यात आला. त्यात एका बैलाच्या पचनसंस्थेत मंगळसूत्र अडकल्याचे ‘एक्स-रे’मध्ये दिसले.
नेमकी पोतं कुठे सापडली
दरम्यान, मालेगावचे रहिवाशी शिवाजी बोरसे हे आपल्या दोन्ही बैलांना २१ सप्टेंबर रोजी चाळीसगाव येथील तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन आले होते. पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने दोन्ही बैलांची सखोल तपासणी केल्यानंतर एक्स-रे काढले. या तपासणीत सोन्याचे मंगळसूत्र नेमक्या कोणत्या बैलाने गिळले आहे, हे समोर आले. ज्या बैलाने ते गिळले त्यांच्या पचनसंस्थेतील रुमेन किंवा रेटिक्युलम यापैकी नेमक्या भागात मंगळसूत्र अडकले याची माहिती मिळाली. त्यांनतर डॉक्टरांनी त्या बैलाचे ऑपरेशन केले.
सोन्याची पोत, आणखी काय निघाले?
बैलाचे ऑपरेशन करण्यात आल्यावर सुमारे तीन तोळे वजनी सोन्याची पोत बाहेर काढण्यात आली. त्यामध्ये ६३ मणी माळेत गुंफलेले होते ते बाहेर काढण्यात आले, तसेच उर्वरित ४१ मेलात नव्हते, त्यामण्याचा ही शोध लागला. यावेळी इतर वस्तूही बाहेर काढण्यात आल्या. त्यामध्ये टेनिस बॉलच्या आकाराचे दोन प्लास्टिकचे गोळे, नायलॉनची वायर, दोन रुपयाचा एक डॉलर, एक रुपयाचे दोन डॉलर यांचा समावेश आहे. तसेच प्लास्टिकच्या वस्तू ही काढल्या.

दरम्यान, डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते. मात्र ते आव्हान स्वीकारून शस्त्रकिया यशस्वी केली. शस्त्रक्रिया चाळीसगावचे सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन डॉ. पवार यांच्या मार्गदर्शनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांच्यासह पशुधन पर्यवेक्षक दीपक सपकाळे, अनिल अहिरे आणि गोरख भोई यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.










