Oscar Award 2027: मराठी चित्रपट महोत्सवासाठी आनंदाची बातमी आहे. मराठी चित्रपटाने अटकेपार झेंडा रोवला आहे. मानाचा समाजाला जाणारा ऑस्कर २०२७: ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी ही घोषणा केली. ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी ही घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती संतोष डावखर यांनी केली आहे. हा चित्रपट १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला.
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख,निषाद भोईर, योगेश सोहोनी, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
चित्रपटाची कथा अशी?
संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, हा चित्रपट एका नवविवाहित जोडप्याच्या पारंपरिक पृष्ठभूमीशी निगडीत असून कथा केवळ धार्मिक विधीपुरती मर्यादित न राहाता अंधश्रद्धा, कुटुंबातील नात्यांचे संघर्ष, समाजातील बदलणारे दृष्टिकोन आदी बाबींवर प्रकाश टाकतो. निवड समितीचे अध्यक्ष पी. सेशाद्री यांनी सांगितले की, २०२७ च्या ऑस्करसाठी ३३ चित्रपटांच्या यादीतून या चित्रपटाची निवड करण्यात आली.
स्पर्धेत ३३ चित्रपट
२०२७ च्या ऑस्करमध्ये प्रवेशासाठी एकूण ३३ चित्रपट सादर करण्यात आले होते, त्यापैकी १४ हिंदी होते. मराठी, तेलगू आणि गुजराती भाषेत प्रत्येकी चार चित्रपट होते. तीन चित्रपट तमिळमध्ये, आणि मल्याळम व नागामी भाषेत प्रत्येकी एक चित्रपट होता. यामध्ये एका मूकपटाचा समावेश होता. तथापि, ‘गोंधळ’ची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली.

‘गोंधळ’ला मिळालेले पुरस्कार
दरम्यान ‘गोंधळ’ चित्रपटाला ५६ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (२०२५) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी सिल्व्हर पीकॉक पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला १७ व्या बंगळूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (२०२६) (FIPRESCI) पुरस्कारही मिळाला. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) (२०२६) या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार हे दोन्ही पुरस्कार मिळाले आहे. २०२६ मध्ये २२ व्या थर्ड आय आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.
गेल्या वर्षी ‘होमबाउंड’ची निवड झाली होती.
गेल्या वर्षी भारताने नीरज घायवान यांच्या महामारीवरील चित्रपट ‘होमबाउंड’ला ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडले होते. तथापि, हा चित्रपट अंतिम नामांकनांपर्यंत पोहोचू शकला नाही.










