होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

त्र्यंबकेश्वर देवस्थानचा मोठा निर्णय: पितृपक्षात वाढती गर्दी लक्षात घेता, व्हीआयपी दर्शन ९ दिवस बंद!

On: October 4, 2026 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Trimbakeshwar News: त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी साठी जाताय मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पितृपक्षाच्या निमित्ताने देशभरातून मोठ्या संख्येने भाविक पितृकर्म व धार्मिक विधींसाठी येत असतात. त्यातच सध्या शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करताना प्रशासनावर ताण येत असून, सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

व्हीआयपी दर्शन १२ ऑक्टोबरपर्यंत बंद

या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि दर्शन व्यवस्था अधिक सुरळीत ठेवण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाच्या सूचनेनुसार दि. ३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन ९ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र शासन, राज्य शासन अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज्यशिष्टाचारासंबंधीच्या लेखी पत्रव्यवहारानुसार असलेल्या अपवादांना हा निर्णय लागू राहणार नाही.

मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे

या निर्णयाचा मुख्य उद्देश वाढत्या गर्दीचे योग्य नियोजन करणे, सामान्य भाविकांना सुलभतेने दर्शन घेता यावे आणि मंदिरातील दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवणे हा आहे. भाविकांनी या निर्णयाची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आल्याची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी दिली.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment