होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

On: October 13, 2026 6:14 PM
Follow Us:
---Advertisement---

New Delhi/Jalgaon: वेगवेगळ्या तीन घटना सायबर गुन्हेगारांनी वृद्धांना टार्गेट केल्याचे समोर आले आहे. पाचोरा येथील ७२ वर्षीय निवृत्त प्राध्यापकाला डिजटल अरेस्ट करून सुमारे साडे पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. सायबर पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. त्यापाठोपाठ इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील माजी संचालक आणि निवृत्त शास्त्रज्ञाची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार आज समोर आला आहे.

मात्र, या प्रकरणाच्या तपासादरम्यान कंबोडिया आणि आग्नेय आशियातील इतर देशांमधील सूत्रधारांशी (हँडलर्स) संबंध असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली. याप्रकरणी अकरा जणांना अटक करण्यात आली आहे.

१.९६ कोटी रुपयांची रक्कम गोठवली

दिल्ली पोलिसांच्या ‘इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स’ (IFSO) विभागाने आंध्र प्रदेशातील एका ७९ वर्षीय व्यक्तीशी संबंधित ‘डिजिटल अरेस्ट’च्या दुसऱ्या एका प्रकरणात ७.२५ कोटी रुपये परत मिळवले आहेत. तसेच, फसवणुकीच्या सुरू असलेल्या तपासाशी संबंधित बँक खात्यांमधील १.९६ कोटी रुपयांची रक्कम गोठवली आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील माजी संचालक आणि निवृत्त शास्त्रज्ञ प्रदीप कुमार दास यांची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली १.२५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.

प्राध्यापकाला केले डिजिटल अरेस्ट

तर आणखी एका घटनेत तुमच्या बँक खात्यातून अतिरेक्यांना पैसे गेल्याने तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्यात येत आहे’, असे धमकावून पाचोरा येथील निवृत्त प्राध्यापक विजयसिंग रामकृष्ण पवार (वय ७२, रा. पाचोरा) यांची ५ लाख २० हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

सागरी सुरक्षेवर भर: युद्धात ‘AI’ प्रणालींचा वापर वाढवणार- नौदल उपप्रमुखांची माहिती

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

केंद्रीय कर्मचारी अन् निवृत्तीधारकांच्या ‘डीए- डीआर’मध्ये लवकरच होणार वाढ; ‘एआयडीइएफ’ने सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Leave a Comment