होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या दर

On: September 12, 2026 7:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold Silver Rate : सोन्या चांदीच्या दराबाबात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सणासुदिच्या काळात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळं ग्राहकांच्या खिशाला झळ लागत होती. अशातच आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

आज, 12 सप्टेंबर 2026 रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2700 आणि चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची लक्षणीय घसरण झाली. त्यानुसार, आज, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 900 रुपये आहे. तर 22-कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.42 लाख आहे. वेगवेगळ्या शहरांतील स्थानिक बाजारपेठेनुसार दरांमध्ये बदल असेल.

तर चांदीच्या दरातही लक्षणीय चढ-उतार दिसून आले आहेत. काल जो भाव 2 लाख 44 हजार 600 रुपये प्रति किलोग्राम होता, तो आज बदलला आहे. 12 सप्टेंबर रोजी, भारतात चांदीचा भाव प्रति किलोग्राम 10 हजार ने घसरून 3 लाख 34 हजार 600 प्रति किलोग्राम झाला.

सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

सोन्याचा दर कमी झाला असला तरी दागिने खरेदी करताना काही गोष्टी विशेषत: लक्षात घेतल्या पाहिजे. दागिन्यांच्या किमतीमध्ये जीएसटी, घडणावळ शुल्क आणि अतिरिक्त शुल्क समाविष्ट असतात. त्यामुळे, दुकानात किंमत विचारताना, फक्त 10 ग्रॅमचा दर विचारू नका. सोन्याची शुद्धता, घडणावळ शुल्क, जीएसटीची माहिती जाणून घेत खरेदी करा.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

‘एल निनो’च्या प्रभावाने हवामानात बदल; फेब्रुवारी महिन्यांपासूनच उष्णता जाणवणार!

मृत्यूचं तांडव: कोलकाता चँगराचेंगरीतील १९ मृत्यूंपैकी १८ जण स्थानिक तर एक बिहारी- मुख्यमंत्र्यांची माहिती; पंतप्रधान मोदी यांनी केले तीव्र दुःख व्यक्त

भारतावर १०० टक्के टेरिफ लागणार की नाही? ट्रम्प १० दिवसात ठरवणार- अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर

रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट; ७८ दिवसांचा बोनस जाहीर

सावधान! सायबर गुन्हेगार करताहेत वृद्धांना टार्गेट; एका निवृत्त शास्त्रज्ञाला ‘डिजिटल अरेस्ट’ करून १.२५ कोटींची फसवणूक; अखेर ११ जण गजाआड

केंद्रीय कर्मचारी अन् निवृत्तीधारकांच्या ‘डीए- डीआर’मध्ये लवकरच होणार वाढ; ‘एआयडीइएफ’ने सरकारकडे केली ‘ही’ मागणी

Leave a Comment