होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

गुंतवणुकीची सुवर्ण संधी! पेशवा व्हीटचा आयपीओ बाजारात, अशी करा गुंतवणूक

On: September 22, 2026 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

Peshwa Wheat IPO: गहू उत्पादनांचे प्रक्रिया आणि पुरवठा करणारी कंपनी ‘पेशवा व्हीट लिमिटेड’ आपला 53.52 कोटींचा इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) घेऊन भांडवली बाजारात उतरली आहे. येत्या 24 सप्टेंबर 2026 पासून हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून 28 सप्टेंबर 2026 रोजी बंद होईल. कंपनीचे शेअर्स 1 ऑक्टोबर 2026 रोजी बीएसई एसएमई (BSE SME) प्लॅटफॉर्मवर लिस्ट होतील. या IPO मुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी निर्माण झाली आहे.

या आयपीओसाठी 95 ते 101 रुपये प्रति शेअर असा प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार, एकूण 52.99 लाख शेअर्स विक्रीसाठी आणले जात आहेत. यात 50.04 लाख शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे, तर 2.95 लाख शेअर्स मार्केट मेकरसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.

किरकोळ विश्वासासाठी 25.03 लाख शेअर्स (एकूण इश्यूच्या 50.02 टक्के) राखीव ठेवण्यात आले आहेत. जरी या आयपीओचा लॉट साईज 1200 शेअर्सचा असला, तरी किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 2400 शेअर्ससाठी (2 लॉट) अर्ज करावा लागेल. यासाठी उच्च प्राईस बँडनुसार (101 रुपये) 2,42,400 ची गुंतवणूक आवश्यक असेल. तर एचएनआय (HNI) श्रेणीसाठी किमान 3,600 शेअर्ससाठी (3,63,600 रुपये) अर्ज करावा लागेल.

दरम्यान, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत येथील ग्रे मार्केटमध्ये या शेअरचा प्रीमियम 58 ते 60 रुपये प्रति शेअर आहे. म्हणजेच उच्च प्राईस बँडनुसार (101 रुपये) हा शेअर 57 ते 59 टक्के लिस्टिंग गेनचे संकेत देत आहे. सन 2023 मध्ये स्थापन झालेली ही भारतीय कंपनी इंदूर येथील 56,10 cut क्षमता (MTPA) असलेल्या प्लांटमधून गव्हावर आधारित प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ तयार करते आणि 4 राज्यांमध्ये संस्थात्मक आणि घाऊक ग्राहकांना पुरवठा करते.

कंपनीची आर्थिक कामगिरी

आर्थिक वर्ष 2026 मध्ये कंपनीचा महसूल आणि नफा दोन्हीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एकूण उत्पन्न 171.55 कोटी रुपयांवरून (FY 2025) 215.96 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. (FY 2026) तर एबिटा 18.05 कोटींवरून 22.73 कोटींवर पोहोचले आहे. तर करोत्तर नफ्यात देखील वाढ झाली आहे. ते 11.84 कोटींवरून 15.81 कोटींवर पोहोचले आहे.

मार्च 2026 पर्यंत कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी 44.96 टक्के आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड 33.44 टक्के नोंदवला गेला आहे. कंपनीचा डेट-टू-इक्विटी रेशिओ 0.55 आहे, तर एबिटा मार्जिन 10.53 टक्के आणि पीएटी मार्जिन 7.32 टक्के आहे. आयपीओनंतर प्रवर्तकांची भागभांडवलातील हिस्सेदारी 52.39 टक्क्यांवर येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment