होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

‘एसआयआर’ प्रक्रिया रद्द करा: राज्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन

On: October 7, 2026 5:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: भारतीय नागरिकांना आपल्याच देशात गेल्या काही निवडणुकात मतदान केल्यानंतर देखील मतदार यादीतून नावं वगळून मतदानापासून वंचित ठेवणाऱ्या एसआयआर (SIR) प्रक्रियाच रद्द करण्यात यावी अशा आशयाचे पाच मागण्यांचे निवेदन जळगाव नागरिक कृती समितीने मुकुंद सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना अजिंठा विश्रामगृह येथे भेट घेऊन देण्यात आले.

प्रसंगी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे माजी सदस्य किशोर मेढे डॉ.मिलिंद बागुल,प्रा.डॉ.सत्यजित साळवे, बापूराव पानपाटील, सुनिल सोनवणे,आर. टी.सोनवणे,चंद्रगुप्त सुरवाडे भेटीप्रसंगी उपस्थित होते.

निवेदनाचा आशय असा

१) नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावर परिणाम होईल अशी कोणती प्रक्रिया राबू नये
२) पात्र मतदारांचे नाव वगळण्यापूर्वी पुरेशी पूर्वसूचना व सुनावणीची संधी द्यावी गरीब महिला जेष्ठ नागरिक दिव्यांग कामगार व ग्रामीण नागरिकांसाठी सुलभ पडताळणी व्यवस्था निर्माण करावी
३) मतदार यादीतील बदलांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करून प्रक्रिया पारदर्शक ठेवावी.
४) नागरिकांच्या हरकती व तक्रारीसाठी जिल्हा न्याय प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून द्यावी
५) लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदार यादी निश्चितच अचूक असली पाहिजे परंतु अचूक मतदार यादीच्या नावाखाली एकाही पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार धोक्यात येता कामा नये. या संदर्भातील मागणी सोबतच एसआयआर प्रक्रिया पूर्णतः रद्द करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment