होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Ganpati Special Trains : बाप्पाच्या दर्शनासाठी ‘गणपती विशेष ‘ रेल्वे गाड्या; मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यानच्या आणखी ४ गाड्यांचा भर

On: September 19, 2026 2:17 PM
Follow Us:
---Advertisement---

Indian Railways: गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. उत्सवादरम्यान, भक्तांच्या सोईसाठी रेल्वेने ३९० ‘गणपती विशेष ‘ गाड्यांची घोषणा केली आहे. नियमित गाड्यांव्यतिरिक्त, यामध्ये मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेने ८सप्टेंबर २०२६ पासून मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान एक नवीन दैनंदिन एक्सप्रेस गाडीही सुरू केली आहे. ‘गणपती विशेष ‘ गाड्यांचाच एक भाग म्हणून, प्रवाशांची गरज लक्षात घेता मध्य रेल्वे मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या चालवणार आहे.

अशा धावणार आहेत गाड्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (४ सेवा)
गाडी क्रमांक 01009 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १९ सप्टेंबर २०२६ आणि २६ सप्टेंबर २०२६ रोजी १३ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०३.०० वाजता पोहोचेल. (२ सेवा)

गाडी क्रमांक 01010 विशेष गाडी २० सप्टेंबर २०२६ आणि २७ सप्टेंबर २०२६ रोजी ०४.०५ वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १८.१५ वाजता पोहोचेल. (२ सेवा)

थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.

संरचना: २ वातानुकूलित तृतीय, १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन.

आरक्षण: गाडी क्रमांक 01009 चे आरक्षण सर्व पीआरएस केंद्रावर आणि आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित डब्यांसाठी सामान्य शुल्कासह आरक्षण यूटीएस प्रणालीद्वारे केले जाऊ शकते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

दुसऱ्या हल्लेखोराची बंदूक जाम झाली अन् वाचले टायगर श्रॉफचे प्राण? राजस्थान येथून तिघा संशयितांना अटक

मित्राला ‘फॉरएव्हर बाय’ म्हणून तरुणीची आत्महत्या? कुटुंबाने घाईत उरकले अंत्यसंस्कार, पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली!

Ketan Agarwal Death Case : लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरण! अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर येथे रामदास आठवले यांचा दुष्काळी पाहणी दौरा; शेतकऱ्याने मांडल्या व्यथा

मोठी बातमी: शासनाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; आज ४ वाजेपर्यंत सर्व व्यवहारपूर्ण करण्याची संधी

जळगाव तापले, तापमान ३६ अंशावर; राज्यावर अवकाळीची छाया, उद्या ‘या’ ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट!

Leave a Comment