होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

अँटी करप्शन विभागाची कारवाई; यावल वनरक्षकाने ९ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

On: March 31, 2026 5:49 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: लाच खोरांच्या मुसक्या आवळण्यास लाचलुचपत विभागाने सुरुवात केली आहे. सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची कामे अडवून त्याच्याकडून लाच मागितली जाते, लाच न दिल्यास काम होत नाही, जिल्ह्यात लाचखोरीची प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहे. लाकूड वाहतुकीचा व्यवसाय सुरळीत ठेवून कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात वनरक्षकाने फिर्यादीकडून ९ हजार रुपयांची लाच मागितल्याने या प्रकरणी यावल वन परिक्षेत्रातील वनरक्षकाविरुद्ध फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी हा आजूबाजूच्या परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्यांच्याकडे असलेल्या मालवाहू वाहनाने यावल तालुक्यातील पाडळसे, अंजाळे, तसेच आजूबाजूच्या परिसरात लाकूड वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याने आपल्या मालवाहू गाड्यांनी लाकूड वाहतूक सुरू राहावी, कोणतीही कारवाई होऊ नये,यासाठी यावल परिक्षेत्राचे वनरक्षक भैयासाहेब भीमराव गायकवाड (४३) यांनी दरमहा ९ हजार रुपये लाचेची मागणी केली.

मात्र, एवढी रक्कम देण्यासाठी नसल्याने फिर्यादीने जळगाव लाच लुचपत विभागाकडे २० मार्चला लेखी तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच दिवशी पडताळणी केली. लाकूड वाहतूक सुरळीत ठेवून कोणतीही कारवाई न करण्याकरिता वनरक्षक गायकवाड यांनी पंचांसमोर तक्रारदाराकडे ९ रुपये लाचेची मागणी केली. याप्रकरणी त्याच्यावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment