होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NEET-JEE Exam: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज; नीट आणि ‘जेईई’साठी मिळणार नि:शुल्क निवासी कोचिंग

On: April 2, 2026 3:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) व इतर प्रवर्गातील (Other) विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर 100’ उपक्रमांतर्गत नीट आणि जेईई (NEET व JEE/Advance) परीक्षांसाठी दोन वर्षांचे निवासी व पूर्णतः नि:शुल्क कोचिंग उपलब्ध करून देण्यात येत आहे. या उपक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी निवड चाचणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत एकूण 100 विद्यार्थ्यांची निवड (NEET + JEE) करण्यात येणार असून त्यामध्ये SC – 14, ST – 36 व इतर – 50 असा संवर्गनिहाय समावेश असेल. तसेच या 100 विद्यार्थ्यांमध्ये 02 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीही विशेष तरतूद करण्यात आलेली आहे.

सदर निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होणार आहे, पहिला टप्पा (Round 1) तालुकास्तरावर होणार असून त्यातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार अंतिम टप्पा (Round 2) जिल्हास्तरावर होईल. निवड चाचणी परीक्षा ही इयत्ता 10 वी (SSC) अभ्यासक्रमावर आधारित असून 100 गुणांची असेल. परीक्षेत भौतिकशास्त्र (20), रसायनशास्त्र (20), गणित (25), जीवशास्त्र (20) व इंग्रजी (15) या विषयांचा समावेश असेल. परीक्षेसाठी 120 मिनिटांचा कालावधी राहील.

सदर परीक्षेला बसण्यासाठी ऑनलाईन नोंदणीची मुदत दि.१२ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे व प्राथमिक निवड चाचणी परीक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी खालील प्रमुख बाबी लक्षात ठेवाव्या

• विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शासकीय/अनुदानित/अंशतः अनुदानित शाळेतून इ.10 वी (मार्च 2026) परीक्षेस प्रविष्ट असावा.
• निवड झाल्यानंतर इ.10 वी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक सादर करणे बंधनकारक राहील.
• सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेत प्रवेश घेणे आवश्यक राहील.
• पालकांचे वार्षिक उत्पन्न कमाल 2 लाख रुपये असावे.
• अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) सादर करणे आवश्यक आहे.
• निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे निवासी पद्धतीने प्रशिक्षण घेणे बंधनकारक राहील.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च, पुस्तके, अध्ययन साहित्य व निवास व्यवस्था पूर्णतः नि:शुल्क उपलब्ध करून दिली जाईल, त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन अथवा खालील लिंक, क्यु आर कोडचा उपयोग अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तथा नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी दिली.

लिंक : https://forms.gle/wGkHiwAs28DJvn279

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे, ‘सुपर 100’ हा उपक्रमात पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने निवड चाचणीसाठी अर्ज करावा.

ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment