होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Stop Food Wasting: अन्नाची नासाडी थांबवणे काळाची गरज! या विषयी जाणून घ्या!

On: April 29, 2026 11:46 AM
Follow Us:
---Advertisement---

Stop Food Wasting: लोक अन्नाची शेती करतात, उत्पादन करतात, खरेदी करतात आणि वापरतात. मात्र एक अशी बाब लक्षात आली आहे की, जागतिक स्तरावर उत्पादित होणाऱ्या अन्नापैकी २५% अन्न जगातील ७९५ दशलक्ष भुकेल्या लोकांना पोसू शकते. इतकी प्रचंड अन्नाची नासाडी होत आहे, हे लक्सच्या घेणे आणि त्यावर उपाय योजना करणे ही यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे, सामाजिक अणे स्वयंसेवी संस्था पाले काम तर करतच आहेत परंतु आपण ही त्यांचे हाथ बळकट करायला हवेत, अन्नाची नासाडी कशी रोखता येईल याविषयी आपण जाणून घेऊया.

जागतिक भूक निर्देशांक (GHI) २०२५ नुसार, १२३ देशांपैकी भारताचा क्रमांक १०२ वा आहे. २५.८ गुणांसह, भारतातील भुकेची पातळी ‘गंभीर’ श्रेणीत कायम आहे, जरी २०२४ च्या तुलनेत किंचित सुधारणा झाली असली तरी. हा अहवाल भारतातील मुलांमधील खुंटलेली वाढ आणि कुपोषण यावर विशेष चिंता व्यक्त करतो. या अहवालीशी भारत सहमत नसला तरी आदिवासी आणि इतर दुर्लक्षित भागात कुपोषणाचे प्रमाण आहे. अन्न नासाडी रोखून अन्नाचे नियोजन आणि व्यापस्थापन होणे काळाची गरज आहे.

‘अन्नाची नासाडी रोखणे दिन’

या दिनाचा उद्देश उरलेल्या अन्नाचा वापर करण्याची पद्धत बदलणे हा आहे, जेणेकरून लोक वापरत असलेल्या अन्नाचा पुरेपूर उपयोग करू शकतील, अन्न वाया न घालवता ते थांबवण्याचा दिवस कसा साजरा करावा हे महत्त्वाचे आहे. घरी अन्नाची नासाडी कमी करा, स्वयंपाकघरातील कचरा कमी करण्यासाठी प्रयत्न करा, जे उरलेले अन्न आणि ताज्या भाज्यांचा उत्तम वापर करण्यासाठी सोप्या पाककृती शोधून त्यावर काम करा, अन्नाचा जास्त वापर करण्यापेक्षा आधीच नियोजन करणे गरजेचे आहे. जसे तुमच्या स्थानिक किराणा दुकानात जाण्यापूर्वीच एक यादी तयार करा. कोमेजलेल्या भाज्या ५ ते १० मिनिटे पाण्यात धुवून ताज्या करा. उरलेले अन्न फ्रीझ करण्याची सवय लावा. ते जास्त काळ ताजे राहण्यासाठी त्यातील शक्य तितकी हवा काढून घ्या म्हणजे त्या जास्त दिवस टिकतील.

अशा कार्यक्रमांत सहभागी व्हा

*जर तुम्हाला या कार्यात अधिक मदत करायची असेल, तर जगभरातील अनेक समुदायांमध्ये आयोजित केलेल्या ‘कंपास ग्रुप’च्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतात. त्यासाठी तुम्हाला त्या ग्रूपशी संपर्क करायचा आहे.

*असे अनेक समुदाय आणि संस्था आहेत, त्यांच्या कामात तुम्ही सहभागी होऊन अन्न नासाडी रोखण्याच्या उपक्रमांना पाठिंबा देऊ शकतात.

*अन्न नासाडी बाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, मुलाखतींचे आयोजन करण्यास, स्वयंपाकाच्या प्रात्यक्षिकांना मदत करा, पाककृती शेअर करा आणि लोकांना अन्न वाया घालवणे टाळण्याच्या फायद्यांबाबत शिकवा. जागरूकता वाढवणे आणि शिक्षण सुधारणे हा ‘अन्न वाया घालवणे थांबवा दिन’ एक महत्त्वाचा मार्ग आहे.

‘अन्न वाया घालवणे थांबवा दिन’ का साजरा करावा?

*फूड सर्व्हिसमधील जागतिक स्तरावरील अग्रणी असलेल्या ‘कम्पास ग्रुप’ने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला हा दिवस, ३० हून अधिक कम्पास देशांमधील ग्राहक, कॉर्पोरेट्स आणि प्रभावशाली व्यक्तींना अन्न वाया जाण्याच्या गंभीर समस्येबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि बदलासाठी प्रेरणा देण्यासाठी एकत्र येण्यास प्रोत्साहित करतो.

अन्नाचा प्रभावीपणे वापर कसा करावा आणि त्याचे जतन कसे करावे, याबद्दलच्या अभावामुळे जगभरात अन्न वाया जाणे ही एक गंभीर समस्या बनली आहे. तथापि, अन्न वाया जाणे थांबवता येते. जगभरात अनेक देशांमध्ये ही मोहीम सुरू आहे. ज्या ठिकाणी अन्नाची गरज आहे अशा ठिकाणी त्यावचे निरोजन करता येतो. अन्नाचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन हे काटेकोरपणे होण्याची गरज निर्माण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment