होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावात उष्णतेचा कहर! महाबळेश्वर ठरतेय पर्यटकांसाठी ‘नंदनवन’; तुमच्या जिल्ह्याचे तापमान किती ते जाणून घ्या

On: May 13, 2026 8:22 PM
Follow Us:
---Advertisement---

Letest Weather News: ‘मे’ महिन्याच्या मध्यावर सूर्य कोपला असून अनेक जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे, राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४५.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे.त्या खालोखाल जळगाववर सूर्य कोपला आहे, सलग चौथ्या दिवशी जळगावचा पारा ४५.५ अंश सेल्सियसवर गेला आहे. अकोला आणी जळगावात भाजून निघाल्यागत स्थिती झाली आहे. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असल्याने जीवाची काहिली होऊन अस्वस्था वाढत आहे. उन्हामुळे घशाला कोरड पडत आहे, त्यामुळे ठराविक वेळेत पाणी प्यावे लागत आहे.

अद्याप मे महिन्याच्या मध्यावरच अशी परिस्थिती आहे, तर आगामी दिवसात तापमान कसे असेल याची ती झलक असावी, त्यामुळे उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. अल निनोचा प्रभाव जाणवू लागला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र तापत असतांना मात्र पर्यटकांसाठी ऐन उंन्हाळ्यात नंदनवन ठरलेले महाबळेश्वरचे किमान तापमानाने सातत्य राखले आहे. येथील पारा किमान ३२.६ इतके नोंदवले गेले आहे, त्यामुळे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटकांचा कल इकडे दिसून येत आहे. दरम्यान हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला १३ आणि १४ मे रोजी एलो अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भाला १३ ते १९ मे पर्यंत येलो अलर्ट दिला आहे. याठिकाणी कधी हवामान कोरडे तर वादळी पावसाचा इशारा दिला आहे.

कोंकण- गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे, विदर्भात हवामान कोरडे होते. मराठवाड्यात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोंकण गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढते तापमान आगामी काळात महाराष्ट्राची परीक्षा बघणारा आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश से.) खालीलप्रमाणे:

मुंबई (कुलाबा) ३४.८,
सांताक्रूझ ३४.४,
अलिबाग ३५.३,
रत्नागिरी ३४.१,
पणजी (गोवा) ३६.०,
डहाणू ३६.४,
पुणे ४०.८,
लोहगाव ४३.२,
अहिल्यानगर ४३.०,
जळगाव ४५.५,
कोल्हापूर ३८.७,
महाबळेश्वर ३२.६,
मालेगाव ४३.८,
नाशिक ४१.२,
सांगली ४०.४,
सातारा ४१.७,
सोलापूर ४१.८,
धाराशिव ४०.८,
छत्रपती संभाजीनगर ४३.६,
परभणी ४३.१,
नांदेड -,
बीड ४४.०,
अकोला ४५.६,
अमरावती ४५.४,
बुलढाणा ४३.५,
ब्रह्मपुरी ४३.५,
चंद्रपूर ४२.२,
गोंदिया ४०.९,
नागपूर ४३.०,
वाशीम ४३.४,
वर्धा ४४.२,
यवतमाळ ४१.८.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment