होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजित दिपकेंच्या आई-वडिलांची घेतली भेट

On: July 26, 2026 3:07 PM
Follow Us:
---Advertisement---

Sanjay Shirsat Meet dipke family: नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरात तीव्र आंदोलन केल्यावर अखेर शनिवारी केंदीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. ‘जेन झी’ (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर अखेर सरकारला दोन पावले मागे हटावे लागले. शिक्षणमंत्र्याचा राजीनाम्याची बातमी कळताच देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. हे यश पूर्णपणे ‘जेन-झी’ चे असून राज ठाकरे यांनी ही हा मोठा विजय सांगत मुबंईत तिरंगा रॅली काढली. या रॅलीला युवकांची मोठी गर्दी आहे. दरम्यान तरुण जल्लोष करत असतानाच एक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेंच्या घरी जात अभिजीतच्या आई-वडिलांची भेट घेतली आहे. या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

नेमके मंत्री संजय शिरसाट काय म्हणाले

या भेटी दरम्यान शिरसाट म्हणाले की, दिपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध आहेत. आंदोलनादरम्यान प्रकरणाला राजकीय वळण लागू नये, म्हणून घरी आलो नव्हतो. आता अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असून सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाठ यांनी दिली. आंदोलना दरम्यान राजकारण होऊ नये म्हणून आंदोलनाच्या काळात ते आले नाही, आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट हे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत. जे काम विरोधी पक्षांना जमलं नाही, ते काम ‘जेन झी’ (Gen Z) विद्यार्थ्यांच्या आंदोलनानं करून दाखवलं आहे. अशावेळी पालकमंत्री या नात्याने आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांची भेट घेत चर्चा केली आहे. एकीकडे, धर्मेंद्र प्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री मानले जात होते. त्यांच्या या राजीनाम्यानंतर देशभरातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळेच मंत्री संजय शिरसाट यांची भेट अनेक अर्थाने महत्वाची मानली जात आहे .

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

एसटीचा उत्पन्न वाढीवर भर: लालपरी आता विनावाहक धावणार: मंत्री प्रताप सरनाईक

‘बीड–पुणे’ १७ सप्टेंबरला तर ‘बीड–मुंबई’ रेल्वे सेवा डिसेंबर अखेर सुरू होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा

राज्य मंत्रीमंडळाने घेतले ‘हे’ 4 धडाकेबाज मोठे निर्णय; नशामुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल

बटाटा चिप्स, नूडल्स, सूपच्या मुदतबाह्य पाकिटावर नवीन तारखा लावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एफडीएच्या कारवाईने खळबळ

पथनाट्याच्या माध्यमातून तरुणाईने टाकला ‘डेअरी’ उद्योगातील वास्तवावर प्रकाश

संघर्ष, साधना म्हणजे आशाताई: घोषाल..पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना आशा भोसले पुरस्कार प्रदान

Leave a Comment