होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या चार खेळाडूंची निवड; विवेकानंद महाविद्यालयातील या खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव

On: August 21, 2026 1:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), मुंबई यांच्या मान्यतेने आयोजित राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील चार खेळाडूंची निवड झाली आहे. खेळाप्रती असलेली आवड कौशल्याच्या जोरावर ही निवड झाली असून या उल्लेखनीय निवडीबद्दल चारही खेळाडूंचे विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या चार खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेसाठी जळगावच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील कु. संस्कृती बोरसे, इशा पुनिया. श्यामल भावसा, दिव्या मोरे या चार खेळाडूंची निवड झाली आहे. खेळातील सातत्य आणि आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर ही निवड झाली असून, त्याच्या या यशाबद्दल स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

सर्वच स्तरातून अभिनंदन

तसेच ही निवड झाल्याबदल एम.जे. स्वायत्त महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे, के.सी.ई.सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. आर. बी.ठाकरे, समन्वयक प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा.शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी, जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. वर्षा पाटील आदिंनी खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जळगावमधून ही सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आले.

या खेळाडूंना क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालय, पालक व जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment