होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे मनपाची ‘फायर ऑडीट’ कार्यवाही; ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

On: September 2, 2026 12:00 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: अमरावती येथे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिका क्षेत्रातील वैद्यकीय आस्थापनांच्या अग्निसुरक्षेबाबत महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना धुळे शहरात घडू नये, यासाठी महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन अधिकारी व आरोग्य अधिकारी यांना शहरातील सर्व शासकीय, खासगी तसेच मनपा मालकीच्या वैद्यकीय आस्थापनांचे अग्निसुरक्षा ऑडीट (फायर ऑडीट) करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

धुळे महानगरपालिका क्षेत्रात नोंदणीकृत १७९ खासगी वैद्यकीय आस्थापना असून मनपा मालकीच्या ५ वैद्यकीय आस्थापना आहेत. या सर्व आस्थापनांनी दरवर्षी फायर ऑडीट करणे आवश्यक असून, रुग्णालये व दवाखान्यांमध्ये आग प्रतिबंधक तसेच आपत्कालीन परिस्थितीत जीवितहानी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अग्निसुरक्षा उपाययोजना कार्यान्वित असणे बंधनकारक आहे.

या अनुषंगाने मनपा आरोग्य अधिकारी व अग्निशमन अधिकारी यांच्यामार्फत सर्व संबंधित वैद्यकीय आस्थापनांना नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ज्या वैद्यकीय आस्थापनांनी अद्याप फायर ऑडीट केलेले नाही, त्यांनी नोंदणीकृत अग्निशमन व जीवसंरक्षक परिनिरीक्षकामार्फत आपल्या इमारती व परिसरातील अग्निसुरक्षा उपाययोजनांचे ऑडीट करून घेणे तसेच आवश्यक त्रुटींची पूर्तता करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ही कार्यवाही ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीत आवश्यक कार्यवाही न करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार संबंधित आस्थापना सीलबंद करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

तसेच फायर ऑडीट न करणे अथवा अग्निसुरक्षा नियमांचे पालन न करणे याबाबत शासन नियमांनुसार निर्धारित शुल्कावर शास्तीची तरतूद असल्याचे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

रुग्णांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, केवळ नियमांचे पालन म्हणून नव्हे तर रुग्ण, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी सर्व वैद्यकीय आस्थापनांनी फायर ऑडीटची कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन धुळे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

ICU जळीत प्रकरण: जिल्हा स्त्री रुग्णालयातील अतिदक्षता विभागाची नव्याने करणार उभारणी: चंद्रशेखर बावनकुळे

सर्दी-खोकला अन् घशात खवखव होतेय का; मग घरगुती काढा देईल आराम! घरातील मसाल्यापासून कसा बनवाल काढा ‘ते’ जाणून घ्या

महाआरोग्य शिबिर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आजार कितीही गंभीर असो, पैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही”

Monsoon Care:  पावसाळ्यात फॉलो करा ‘या’ 10 टिप्स, डेंग्यू- मलेरियासारख्या आजारांपासून राहाल सुरक्षित

Health News: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजपासून महाआरोग्य शिबिर

Reason of Weak Immunity: ‘या’ 5 सवयी कमी करताय तुमची रोगप्रतिकार शक्ती! सावध व्हा, नाही तर होईल नुकसान

Leave a Comment