होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

पेपर नव्हे आमची स्वप्ने भंगले, ‘एमपीएससी’ पेपरफुटी विरोधात जळगावमध्ये विद्यार्थी आक्रोश मोर्चा!

On: September 9, 2026 6:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Mpsc Paper Leak Issue: राज्यभर गाजत असलेल्या एमपीएससी पेपर फुटीच्या विरोधात जळगाव येथे जीएस ग्राउंड येथून बुधवारी एमपीएससीच्या उमेदवारांनी विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढला होता. यावेळी एमपीएससीचे अध्यक्ष व सचिवांचा राजीनामा घेऊन तिथे तत्काळ स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमावेत, अशी मागणी मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी बोलतांना एमपीएससीच्या उमेदवार म्हणाले की, पेपर नव्हे आमचे स्वप्न भंगले असून आई- वडिलांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकल्याची खंत व्यक्त करून.एमपीएससीवरील आमचा विश्वास उठला आहे. पुढील परीक्षा तरी पारदर्शक व्हाव्या अन्यथा गोरगरीब विद्यार्थी देशोधडीला लागतील, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.

दरम्यान याआधी सोमवारी पुणे येथे तर मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथे ‘एमपीएससी’च्या अनेक उमेदवारांनी आंदोलन केले आणि अलीकडील भरती परीक्षांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. आज जळगावमध्ये आंदोलन करण्यात आले.

शहरातून आक्रोश मोर्चा

दरम्यान सकाळी जीएस मैदानावरून मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जीएस ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात एमपीएससीची तयारी करणारे उमेदवार मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. यावेळी हातात पोस्टर्स आणि बॅनर्स घेऊन घोषणाबाजी केली. एमपीएससीची फसवणूक बंद करा, पेपर फुटी प्रकरणी जबाबदार व्यक्तींना कडक शिक्षा करा, न्याय हवा! पारदर्शकता हवी! एमपीएससीची विश्वासार्हता हवी! अशी घोषणा फलके हातात घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते.

एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या प्रमुख मागण्या

  • MPSC अध्यक्ष व सचिवांना राजीनामा घेऊन तिथे तत्काळ स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी नेमावेत.
  • गट-ब परीक्षेतील आधेपांवर व दिवसांत सष्टीकरण देऊन गैरप्रकाराची चौकशी करावी.
  • राज्यसेवा मुख्य 2025 आणि कृषिसेवा परीक्षेच्या वर्गनातमक पेपर तपासणीतील चुकांची चौकशी व्हावी. मुंबई क्राईम ब्रँचने MPSC ला दिलेला प्राथमिक चौकशी अहवाल सार्बजनिक करावा.
  • अटक आरोपींबर सर्व सचिव अभियीत लेंडवेटच्या कार्यकालातील सर्व परीक्षांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
  • आरोपी लेंडवेट, मराठे आणि नव्याने यांच्या सेवावकाळाची व पदोन्नती निकषांची सखोल चौकशी व्हावी.
  • तिन्ही आरोपींच्या संपर्कातून निवड झालेल्या उमेदवारांचे सीडीआर (CDR) तपासावेत.
  • प्रविण पाटील व मधूर ठाकरे व्यातिरिक्त इतर एजंट्सच्या सहभागाची सखोल चौकशी व्हावी.
  • इतर परीक्षांच्या निकालांबाबत विद्यार्थ्याच्या शंकांची दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी.
  • ‘DI’ मधील संशयास्पद निकालांचे व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.
  • २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क पूर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने घ्यावी.
  • लघुलेखक (Stenographer) पद पुनर्निर्मिती करण्यात यावे.

पेपरफुटी प्रकरण असे

दरम्यान राज्यभरात गाजलेल्या एमपीएससी परीक्षा पेपरफुटीवरुन आता कारवाईला वेग आला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी नंदुरबार येथून ऋतुजा पाटीलला देखील अटक करण्यात आली होती. पोलिसांनी नंदुरबारमध्ये ऋतुजाला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर तिला अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. 270 पानांच्या व्हॉट्सॲपवरील चॅट्समधून तपासाला नवी दिशा मिळाली.

ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरणात आरोपी ऋतुजा पाटीलचा मोबाईल उल्हास नदीत फेकल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, सहआरोपी लोकेश उर्फ गौरव पाटीलच्या मोबाईलमधून ऋतुजा आणि गौरव यांच्यातील तब्बल 270 पानांच्या चॅट्स क्राईम ब्रँचकडून हस्तगत करण्यात आले आहेत याप्रकरणी गुन्हे शाखेने अगोदरच तीन अधिकाऱ्यांसह 7 जणांना अटक केली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment