होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

आधुनिक काळाच्या गर्तेत पारंपरिक पोळा होतोय नामशेष; तरुण पिढी बैलजोडी सोडून ट्रॅक्टरकडे वळली

On: September 9, 2026 7:39 PM
Follow Us:
---Advertisement---

Pola Festival: बैलांचा सण म्हणजे पोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातील आनंदाचा सोहळा मानला जातो. परंतु आधुनिकतेच्या लाटेत आणि यंत्रांच्या वापरामुळे पारंपरिक पोळ्याचे स्वरूप झपाट्याने बदलत चालले आहे. त्यामुळे पारंपरिक पोळा हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र सद्या ग्रामीण भागात दिसत आहे.

पूर्वीच्या काळी पोळ्याला काही दिवस अगोदरच गजबजाट सुरू व्हायचा. गावोगावी पोळ्या निमित्ताने बाजार गजबजून जायचे यातच शेतकरी बैलांना तेल मालिश करणे, अंग धुणे, सुंदर रंगीत शिंगे रंगवणे, डोक्यावर सुंदर सजावट, गळ्यातील गजरे आणि घंटा या सर्व तयारीत शेतकऱ्यांचे संपूर्ण कुटुंब रमून जायचे. गावात ढोल-ताशांचा गजर, बैल जोड्यांची मिरवणूक यामुळे पोळा हा फक्त धार्मिक विधी न राहता सामाजिक एकोप्याचा उत्सव ठरायचा.

परंतु आजच्या काळात ट्रॅक्टर, आधुनिक शेतीची साधने आणि मोबाईलच्या आहारी गेलेले तरुण पिढीमुळे या उत्सवाला पूर्वीचे महत्त्व कमी झाले आहे. बैलांचे पालनपोषण कमी झाले असून अनेक शेतकरी फक्त शेतीकामापुरते बैल ठेवतात, त्यामुळे सजावट आणि मिरवणुकीचे प्रमाण घटले आहे. आता फक्त औपचारिक पूजा आणि प्रतीकात्मक मिरवणूक एवढेच उरले आहे.

ग्रामीण भागातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की, पूर्वी पोळ्याच्या निमित्ताने गावात ऐक्य वाढायचे. सर्व जण मिळून बैलांना सजवायचे, बैलगाड्यांच्या शर्यती घ्यायचे. पण आता ही परंपरा इतिहासजमा होत आहे.

शहरांच्या झगमगाटात तरुणाईला पारंपरिक पोळ्याचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. अन्यथा पुढील काही वर्षांत पोळा हा केवळ पुस्तकांतील उत्सव राहील. पारंपरिक परंपरेचे संवर्धन आणि ग्रामीण संस्कृतीचे जतन करणे ही आजच्या पिढीची जबाबदारी आहे. कारण पोळा हा फक्त बैलांचा सण नसून शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर करणारा आणि संस्कृतीला जोडणारा उत्सव आहे. अशा प्रकारे आधुनिकतेच्या गर्तेत पारंपरिक पोळा हळूहळू नामशेष होतोय, आणि त्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी समाजाने एकत्र येणे काळाची गरज बनली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment