Indian Railway: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. १४ सप्टेंवर ते २५ सप्टेंवर २०२६ या कालावधीत साजरा होणाऱ्या उत्सवादरम्यान, प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशानाने ३८६ गणपती विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. यामध्ये नियमित गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेने ८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान एक नवीन दैनंदिन एक्सप्रेस गाडीही सुरू केली आहे. गणपती विशेष गाड्यांचा भाग म्हणून, प्रवाशांची गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वे मुंबई आणि सावंतवाडी रोड दरम्यान ४ अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्याही चालवणार आहे.

गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अनारक्षित विशेष गाड्या (४ सेवा)
गाडी क्रमांक , 01009 अनारक्षित विशेष गाडी १२ सप्टेंबर २०२६ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल. (२ सेवा)
गाडी क्रमांक 01010 अनारक्षित विशेष गाडी १३ सप्टेंबर २०२६ आणि १४ सप्टेंबर २०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून ०४.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १८.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (२ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप.
गाडीची संरचना: १२ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे आरक्षण युटीएस प्रणालीद्वारे केले जाऊ शकते.
तिकीट बुकिंगसाठी प्रवासी ‘रेलवन’ ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
प्रवाशांना मध्य रेल्वेचे आवाहन
गणपती उत्सवाच्या काळात स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी होण्याची शक्यता आहे. प्रभावी व्यवस्थापनासाठी, आरपीएफ, जीआरपी आणि शहर पोलिसांच्या समन्वयाने प्रवाशांची सुरक्षा, सुरक्षितता आणि सोयीसाठी व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवाशांनी देखील नियमांचे पालन करत सहकार्य करण्यावे, असे अवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.









