होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

यंदा तब्बल १२ दिवस रंगणार गणेशोत्सव: ९ वर्षांनंतर दुर्मिळ योग

On: September 13, 2026 5:48 PM
Follow Us:
---Advertisement---

अमोल महाजन
Jalgaon: गणेशभक्तांसाठी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी यंदाचा उत्सव अत्यंत खास ठरणार आहे. तिथीच्या विशेष गणनेमुळे यंदाचा गणेशोत्सव नेहमीच्या १० दिवसांऐवजी तब्बल १२ दिवसांचा असणार आहे. सुमारे ९ वर्षांनंतर असा दुर्मिळ योग आला असून, यापूर्वी २०१७ मध्ये १२ दिवसांचा गणेशोत्सव साजरा झाला होता.

दुर्मिळ योग

यंदा सोमवारी, १४ सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी असून, शुक्रवारी, २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला उत्सवाची सांगता होणार आहे. भविष्यात २०३५, २०४४ आणि २०५३ या वर्षांत असा योग पुन्हा पाहायला मिळेल. ज्योतिषतज्ज्ञांनुसार, यंदा आणखी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आला आहे. भाद्रपद शुक्ल तृतीया (हरतालिका) आणि गणेश चतुर्थी हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजे १४ सप्टेंबरला आले आहेत. असा योग तब्बल २६ वर्षांनंतर (यापूर्वी १९९६ व २००० मध्ये) आला आहे.

१४ सप्टेंबरला सकाळी ७:०६ वाजेपर्यंत तृतीया तिथी असल्याने हरतालिका पूजन आणि त्यानंतर मध्यान्ह काळात श्री. गणेशाची स्थापना केली जाईल. शास्त्रात वेळेबाबत कोणताही कडक नियम नसून दिवसभरात दोन्ही पूजा सहज करता येतील, असे ज्योतिषांनी स्पष्ट केले आहे. दोन अतिरिक्त दिवस मिळाल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

यंदाच्या उत्सवाची प्रमुख वैशिष्ट्ये

उत्सवाचा कालावधीः १४ सप्टेंबर (गणेश चतुर्थी) ते २५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) कालावधी वाढण्याचे कारणः तिथींची विशेष वाढ आणि नक्षत्र गणना विशेष योगः हरतालिका व गणेश चतुर्थी एकाच दिवशी (२६ वर्षांनंतर) आहे. आगमन व विसर्जन मिरवणुका, भव्य देखावे, विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मंडळांना पुरेसा वेळ मिळणार आहे. ढोल-ताशा पथकांची सुपारी देण्यापासून ते मंडप उभारणीच्या कामांना पूर्ण वेग आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment