होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

गणेश भक्तांसाठी गुडन्यूज: जळगावमध्ये पुढील तीन दिवस हवामान कोरडे; मुसळधार पावसाची शक्यता कमी

On: September 15, 2026 3:34 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात रविवारी ४२ मिमी पावसाची नोंद झाली. धुव्वाधार पावसाने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, आज आणि उद्या जळगावमध्ये हलक्या सरी बरसतील असा अंदाज आहे. जळगाव व नाशिकला १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा आंनद द्विगुणित होणार आहे. रात्री भक्तांना श्री गणरायाचे दर्शन घेता येणार आहे. कुलाबा हवामान विभागाने १५ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान कोणताही इशारा दिलेला नाही.

गणेश देखावे बघता येणार

दरम्यान सोमवारी श्री गणेशाचे उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले आहे. यंदाचा गणेशोत्सव ११ दिवस चालणार आहे . त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यात पावसाने उघडीप दिल्याने बाजारात नागरिकांची लगबग होती. आता तर, पावसाने पुढील काही दिवस विश्रांती घेतल्याने भक्तांना शहरातील गणेश मंडळाना भेट देऊन गणेश देखावे देखील बघता येणार आहे.

उत्तर महाराष्ट्रातील हवामान

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर परिसरात मुसळधार पावसाचा इशारा नसल्याने या ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये हवामान कोरडे राहणार आहे. तर इतर ठिकाणी हलक्या, मध्यम सरी बरसतील. मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला नसल्याने पावसाच्या हलक्या सरी वगळता मुसळधार पाऊस पडणार नाही, असा अंदाज आहे.

१६ सप्टेंबरला कोकण आणि गोव्यातील अनेक ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही ठिकाणी; आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची दाट शक्यता आहे. तसेच १७-१८ सप्टेंबरला कोकण, गोवा आणि विदर्भातील काही ठिकाणी; तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment