होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वाघुरच्या जलसाठ्यात किंचित घट; तर हतनूर धरणाची जल पातळी वाढली, दोन्ही धरणांची पाणी पातळी किती ‘ते’ जाणून घ्या

On: September 18, 2026 3:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगावमध्ये पावसाने दडी मारली आहे. तसेच पुढील काही दिवस कुलाबा वेधशाळेने जळगावला कोरडे हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जळगावकरांना पुढील पुढील काळात पाणी टंचाई भासणार नसली तरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या जलसाठ्यात घट झाली आहे. गेल्या १८ दिवसात २.२६ टक्क्याची तूट जलसाठ्यात दिसून येत आहे. तर हतनूर धरणातील जलसाठ्यात २२.५९ टक्के वाढ झाल्याचे जलसंपदा विभागांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

१८ दिवसात जलसाठ्यात घट

वाघूर धरणात गेल्या १८ दिवसात जलसाठ्यात किंचित घट झाली आहे. वाघुरचा जलसाठा १ सप्टेंबर रोजी ७५.२५ टक्के इतका होता. आजचा १८ सप्टेंबर रोजी जलसाठा हा ७२.९९ टक्के इतका आहे. त्यामध्ये २.२६ टक्के घट दिसून येत आहे. ही आकडेवारी चिंताजनक नसली तरी पाणी जपून करावे लागणार आहे. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात पाऊस हजेरी लावत असतो, यंदा मात्र गणेशोत्सवात पावसाने दांडी मारली आहे. त्याचा परिणाम साठ्यावर दिसून येत आहे. सध्या धरणात आजचा उपयुक्त एकूण जलसाठा हा २५७ (दलघमी) असून मृतसाठा वगळता उपयुक्त १८१.२६ (दलघमी) जलसाठा उपलध आहे.

जलसाठ्यात चांगली वाढ

त्यातुलनेत हतनूरच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. १८ दिवसात हतनूर मध्ये २२. ५९ टक्के जलसाठा वाढल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवा आधी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाचा फायदा झाल्याचे दिसून येते आहे. हतनूर धरणात सध्या ८८.७१ टक्के जलसाठा असून १ सप्टेंबर रोजी तो ६६.१२ टक्के होता. त्यात आता समाधानकारक वाढ झाली आहे. प्रकल्पातील एकूण साठा हा ३५९.२० (दलघमी) आहे. आजचा उपयुक्त जलसाठा २२६.२० (दलघमी) उपलब्ध आहे. शहराला सध्या तरी पाणी टंचाई समस्या भेडसावणारी नसली तरी पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment