होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खान्देशच्या प्रवाश्यांनो लक्ष द्या: जळगाव–भुसावळ दरम्यान पाचव्या रेल्वे मार्गाच्या कामामुळे उद्या ‘मेमू’सह ‘या’ गाड्या रद्द

On: September 18, 2026 7:46 PM
Follow Us:
---Advertisement---

Bhusawal News: भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव स्थानकावर जळगाव–भुसावळ पाचव्या रेल्वे लाईनच्या अनुषंगाने यार्ड रिमॉडेलिंगचे प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंग काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. तर देवळाली-भुसावळ मेमू, नाशिक-बडनेरा मेमू, इगतपुरी–भुसावळ मेमू व अन्य गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वेने कळवले आहे.

शनिवारी (दि.१९) थावे–सूरत एक्सप्रेसचे पावण दोन तास आणि भागलपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचे दीड तास नियमन करण्यात येणार आहे.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या

बुधवारच्या (दि.२३) रद्द गाड्या – सूरत–भुसावळ एक्सप्रेस, उधना–भुसावळ एक्सप्रेस, भुसावळ–उधना एक्सप्रेस, भुसावळ–देवळाली मेमू, बडनेरा–नाशिक मेमू.

गुरूवार (दि.२४) रद्द गाड्या- भुसावळ–सूरत एक्सप्रेस, नंदुरबार–भुसावळ पॅसेंजर, भुसावळ–नंदुरबार पॅसेंजर, इगतपुरी–भुसावळ मेमू, भुसावळ–इगतपुरी मेमू, देवळाली –भुसावळ मेमू, नाशिक–बडनेरा मेमू.

२४ सप्टेंबरला पुढील गाड्यांचे नियमन करण्यात येणार

हजरत निजामुद्दीन–वास्को द गामा एक्सप्रेस पावणे दोन तास, लखनऊ–पुणे एक्सप्रेस दीड तास, गोरखपूर–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसचे सव्वा तास, थावे–सूरत एक्सप्रेसचे एक तास, गुवाहाटी–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस- दीड तास.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment