Jalgaon News: जळगाव जिल्हा रूग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३२ वी वार्षीक सभा रविवारी यशवंतराव मुक्तांगण येथे सस्थेचे चेअरमन सरफराज सिकंदर तडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेला प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक जाधव आणि डॉ. मोनीका देसाई हे उपस्थित होते.
यावेळी दरवर्षी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात येतो. यंदा ही विविध शैक्षणीक क्षेत्रात नेपुण्य मिळवणाऱ्या ३२ पाल्यांचा स्मृतीचिन्ह व बक्षीस रूपी रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. तसेच १० सेवा निवृत्त सभासदांना सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देउन सन्मानित करण्यात आले.

संस्थेस ऑडीट लेखा परीक्षण वर्ग अ मिळालेला आहे. तसेच १३ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. लाभांश वाटप २१ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रास्तविक संस्थेचे चेअरमन सरफराज सिकंदर तडवी यांनी केले. तर, सभेचे सुत्रसंचालन सुरेखा लष्करे व सविता बिऱ्हाडे यांनी केले, आभार अमीत वागदे यांनी मानले. त्यानंतर राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला.








