होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सोनी नगरमध्ये गतिरोधक बसवा, रस्ता सुरक्षेच्या उपाययोजना करा! मनसेचे मनपा आयुक्तांना निवेदन

On: September 22, 2026 7:04 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: पिंप्राळा- सावखेडा रोडवरील सोनी नगर परिसरात वाहनांचा वाढता वेग आणि अपघातांची शक्यता लक्षात घेता तातडीने गतिरोधक व आवश्यक रस्ता सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जळगाव शहर महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाहनांच्या वेगावर नियंत्रण हवे

सोनी नगर परिसर प्रभाग क्रमांक १० मध्ये येत असून, या मार्गावर दिवसंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. अनेक वाहनं भरधाव वेगाने धावत असल्यानं स्थानिक नागरिक, पादचारी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः सोनी नगर प्रवेशद्वार, मुरली मनोहर अपार्टमेंटसमोर आणि चंद्रकला अपार्टमेंटसमोर वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अपघाताच्या घटनांना आळा बसेल का?

दरम्यान, दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी मनपाकडे करण्यात आली आहे.
केवळ गतिरोधक बसविण्यापुरती कार्यवाही न करता आवश्यकतेनुसार वेगमर्यादा फलक, सावधानता फलक, रस्ता सुरक्षा चिन्हे, पादचारी सुरक्षेच्या उपाययोजना, पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था याबाबतही कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, चेतन पवार, शाखा अध्यक्ष युसुफ खाटीक, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, यांच्यासह सोनी नगरातील रहिवासी नरेश बागडे,विनोद निकम, सरदार राजपूत, भैय्यासाहेब बोरसे, घनश्याम बागुल ,सुनील पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment