Jalgaon News: जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक कार्तिक कासार, चतुर्थ क्रमांक अंकित दुग्गड यांनी तर, पाचवा क्रमांक निशांत साळी यांनी पटकाविला. यास्पर्धेत मुलांसोबतच मुलींनीही आपली चमक दाखवली.
या जिल्हास्तरीय शालेय बुढोबळ स्पर्धेत मुलींच्या १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक ऐश्वर्या चौरसिया हिने तर, द्वितीय क्रमांक दिशा चांडक, तृतीय क्रमांक शर्वरी भुजबळ हिने मिळविला. या सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून त्यांची निवड झाली आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक डॉ रणजीत पाटील यांनी मार्गदर्शन केले.

खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाविद्यालयात, पालकांमध्ये तसेच क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील विभागीय स्पर्धेसाठी सर्व स्तरातून खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी एम.जे. स्वायत्त महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. केतन नारखेडे, के.सी.ई.सोसायटी कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.आर. बी.ठाकरे, प्रा. स्वाती बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा.शिल्पा सरोदे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा. उमेश पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी, जिमखाना समिती चेअरमन वर्षा पाटील आदिंनी सर्व खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.











